पहाट
बघावी प्रत्येकाने रोज सुंदर पहाट
उठायला वाजवू नये सकाळचे आठ
ऐकावे पक्षांचे मधूर आवाज
बघावा त्यांनी घातलेला नवीन साज
करावा प्राणायाम योगा पहाटेच्या प्रहरी
जाऊ नये आळसाच्या आहारी
व्यायाम चालणे करावे पहाटेला
नवीन उर्जा मिळेल शरीराला
पहाटेला डोळे मिटून बसावे शांत
मग दिसेल भगवंत बसलेला आत
पहाटेच्या प्रहरी म्हणावे हरी हरी
येतील सुखाच्या सरींवर सरी
पहाट म्हणजे पुर्नजन्मच जणू आपला
प्रत्येक गोष्ट करताना प्रश्न विचारावा स्वत:ला
रोजच अशी पहाट दिसावी
त्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी
प्रा.दगाजी देवरे
Comments
Post a Comment