निर्णयाची शीघ्रता
जीवनात बर्याच वेळेला असे प्रसंग येतात की कसा निर्णय घ्यावा तेच कळत नाही काही निर्णय विचार करून वेळ घेऊन घ्यायचे असतात पण काही निर्णय त्वरीत घ्यावे लागतात थोडा जरी उशीर झाला तरी त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागतात म्हणून क्षणाचाही विलंब न करता असे निर्णय ताबडतोब घ्यावेत उदा.रेल्वेचे आरक्षण केलेले आहे व घरातून तुम्ही असा विचार केला की आपण स्टेशनला दहा मिनिटात पोहचू पण ट्रफिक अशी लागते की रिक्षाने जायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही व चालत गेलात तर तुम्ही दहा मिनिटात पोहचणार अशावेळि रिक्षामध्ये न बसता त्वरीत उतरून स्टेशन पायी पायी गाठावे असा निर्णय न घेतला तर ट्रेन मात्र निघून जाईल व पश्चाताप करायची वेळ येईल तसेच गाडी चालवताना मध्येच जर कुणी आले तर त्यावेळी विचार काही सेकंदात घेऊन लगेच काही सेकंदातच त्याची अंमलबजावणी करायची असते डोळ्याची पापणी हलते त्या आधीच झटपट निर्णय घ्यायचा असतो तरच संकटातून तुमची सुटका होईल नाहीतर फार मोठे संकट कोसळू शकते घरात काही कारणास्तव तंटे होतात त्यावेळी त्वरीत निर्णय घेऊन शांतता कशी निर्माण याचा विचार करावा नाहीतर तेच भांडणे अक्राळविक्राळ रूप धारण करते बोलताना वागताना प्रत्येकाकडून चुका होतात तेव्हा क्षमा त्वरीत मागून समोरच्याला शांत करणे त्यावेळी जरुरी असते व तिच क्षमा मोठ्या भांडणापासून सुटका करते काहीवेळा कुणाचा जीव संकटात असेल तेव्हा त्वरीत निर्णय घेऊन त्याचा जीव वाचवता येईल तेथे विलंब चालणार नाहीमिटींगला जायचे आहे पण काही कारणास्तव लवकर पोहचू शकलो नाही तर अशावेळी बाकी पर्यायांचा विचार करून लवकर पोहचता येईल का ते पाहावे व हा वाचार काही मिनिटात घ्यायचा असतो काहीवेळा आपल्यावर खोटे आरोप केले जातात तेव्हा हजरजबाबी राहून त्याचवेळी तुमचे मत
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment