Skip to main content

स्वत:ला जिंकणे अवघड

स्वत:ला जिंकणे अवघड

प्रत्येक माणूस दुसर्‍यावर हूकूमत गाजवतो व आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो दुसर्‍याने असे वागले पाहिजे तसे वागले पाहिजे पण स्वत:मधील दोष कधीच त्याला दिसत नाही स्वत:ला जडलेले व्यसने हे त्याला उभ्या आयुष्यात सोडवता येत नाही स्वत:मधील दोष आयुष्य निघून जाते पण दोष दूर करू शकत नाही काहींना खूप राग येतो मनापासून प्रयत्न केला तर तो नियंत्रणात आणू शकतात पण त्यावर तो नियंत्रण मिळवू शकत नाही दुसर्‍याला कायम आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यापेक्षा स्वत:ला उभे करा व आत डोकावून बघा म्हणजे समजेल की स्वत:मध्ये सुधारणा करणे किती गरजेचं आहे जीवन जगत असताना अनेक गोष्टींची गरज लागते पण माणूस दुसर्‍यांवरअवलंबून असतो स्वत:त्याला काही करायचेच नसते दुसर्‍याने सुधारले पाहिजे आपण दोषरहित आहोतअसेच सर्वाना वाटते स्वत:मधील दोष दूर करायला सुरवात केली तर दुसर्‍यामध्ये दोष दिसणारच नाहीत जेव्हा आपण म्हणतो तुला अक्कल नाही तेव्हा त्याच्यातला चांगला गुण पाहण्याची पात्रताच आपल्यात नसते आपण कमी पडतो त्याला समजून घेण्यात.स्वत:ला वाईट विचारांपासून रोखणे  .वाईटशब्द तोंडातून जाणार नाहीत याची काळजी घेणे नको ते बघणे नको तेथे जाणे सकारात्मक विचार ठेवणे अशा गोष्टी स्वत:मध्ये आहेत पण त्या जागृत करणे  हे सोपे नाही तेव्हा स्वत:शीच लढावे लागेल म्हणजेच स्वत:शीच युध्द करावे लागेल तरच अशा गोष्टी येवू शकतील आपण दुसर्‍यांना कमी दाखवण्यातच सर्व शक्ती वाया घालवतो व आपणआहोत तसेच राहतो  स्वत:चे वजन नियंत्रणात माणूस आणू शकत नाही कारण समोर दिसले  खायला तर जिभेला पाणी सुटते व मग खातच सुटतो त्याला चालायला कंटाळा येतो व्यायामचा कंटाळा येतो माहीत असते व्यसने वाईट आहे तरीही तो करत असतो दारू सिगारेट वाईट असते हे माहीत आहे तरीही स्वत:वर नियंत्रण नसल्याने ते सुटू शकत नाही म्हणून स्वत:ला जिंकणे हे फार अवघड आहे जे जिंकले ते या संसार सागरातून तरून गेलेत म्हणून स्वत:ला वाईट व्यसने असतील तर पूर्णपणे सोडण्यासाठी स्वत:शीच युध्द करा व जिंकून दाखवा सर्व भावनांवर नियंत्रण ठेवायला जमायला हवे म्हणून बाहेरच्यांशी युध्द करण्यापेक्षा स्वत:शीच युद्ध करू व जिंकून दाखवू बघू या जमतं का
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...