अभिनंदन
छान छान मार्कस मिळवून
उंच केली आईबाबांची मान
खरी मेहनत फळाला आली
म्हणून वाटतो तुमचा अभिमान
रात्रंदिवस अभ्यांस करून
दिले होते झोकून अभ्यांसाला
आज सांगत राहतील आईबाबा
बघा किती छान मार्कस मिळाले बच्चाला
जशी जशी परिक्षा जवळ होती
तसे टेंशन वाढत होते
आईबाबा होते तुमच्या पाठीशी
म्हणून यश आज तुमच्या नजरेला दिसते
अभ्यांसाबरोबर जेवनाचीही घेत होते
तुमची आईबाबा काळजी
ही त्यांचीही होती परीक्षा
म्हणून ते ही बोलत होते परीक्षा आहे माझी
तुमचे यश बघून अभिमानाने
भरुन आला त्यांचा ऊर
असेच दाखवा त्यांना यश
अन् कधीच जावू नका मनाने दूर
सर्वांना तुमच्या यशाला बद्दल
देतो लाख लाख शुभेच्छा
परमेश्वर करील अशाच
तुमच्या पूर्ण इच्छा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment