तुझी आठवण
येते आठवण तुझी
कसं सांगू तुला
माझाच मी नसतो
असं कायम होतं मला
जेवतांना ताट स्वच्छ ठेवून
तुझी आठवण देऊन जाते
त्यातील पदार्थ बघून
तु त्याच्यांत दिसायला लागते
पाणी चावून पिणे
है तुझे सांगणे आठवतं
चावून चावून खायच
हे मात्र करायलाआवडतं
आज घर साफ करताना
आली तुझी आठवण
नीटनेटकेपणाची झाली आता सवय
त्याचे आहे तुच खरे कारण
कपड्यांची निवड कशी करावी
हे तुचं मला शिकवले
ऊतू मातू नये ही शिकवण
जोपासायला लावले
चालता बोलताना तू लागते
सगळीकडे दिसायला
मन मात्र हरवून जाते
तुझ्या आठवणीत रमायला
तुझे रूसने तुझे हसणे
सर्वच मोहात पाडते
तुझ्या वजनाने मात्र
चिंतीत व्हायला होते
अशीच नेहमी हसत रहा
सर्वांना हसवून
तुझे हसणेच देते
तुझी सर्वाना आठवण
दगा
Comments
Post a Comment