Skip to main content

खेळ

खेळ
बालपणी अनेक प्रकारचे आपण खेळ खेळायचो त्यावेळी फार मजा वाटायची खोटा खोटा संसार खोटे खोटे लग्न असो तर आपण खरा आनंद लुटायचो त्यावेळी निरागस मन असायचे त्यामुळे निख्खळ आनंद मिळायचा व तो खेळ चालू असताना मग कबड्डी असो किंवा सारीपाट असो लंगडी असो की खो खो असो तसेच लपाछपी असो की विटी दांडू असो अशा अनेक प्रकारच्या खेळात आपण रमून जायचो शहरातील गोष्ट बघितली तर मोबाईलमध्ये गेम असो किंवा क्रिकेट असो बुध्दिबळ असो की टेनिस अशा खेळांमध्येही मुलांना आनंद मिळतो जर आईने हाक मारली तर आपण सांगू शकतो की थांब जरा  खेळ संपला की मी येतो किंवा काही सांगतात आज मला मनोसक्त खेळायचे आहे मग बिचारी आई काय बोलणार.अर्धवट खेळ आपण न खेळता तो पूर्ण करूनच आपण घरी जातो जरी खेळ अपुर्ण राहीला तरी मित्रांच्या परवानगीने आपण तो सोडतो पण
    खर्‍या जीवनात हा संसार म्हणजे एक खेळच आहे व तो प्रत्येकजण आटापिटा करून खेळत असतो पण खेळाचे नियंत्रण माणसाच्या हातात नाही मग पंतप्रधान असो वकिल असो उद्योगपती असो  श्रीमंत असो गरीब असो तरुण असो म्हातारा असो शिकलेला असो किंवा अशिक्षित असो मग तो कुणीही असेना त्याला हा संसाराचा खेळ पूर्ण करताच येईल हे सांगता येत नाही कधी तो exit  घेईल किंवा त्याला घ्यायला लावीन हे सांगताच येत नाही अर्धवट संसार सोडून त्याला जावे लागते मुले लहान असताना बापाचा मृत्यू होतो ऐन सुख  भोगत असताना अचानक जावे लागते ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती कधी नाहीशी होईल याची खात्री देता येत नाही कुणाचीही परवानगी न घेता तो कायमचा निघून जातो कधीही परत न येण्यासाठी असा अनिश्चितेचा खेळ अनादी काळापासून चालू आहे व पुढेही चालू राहणार
  अशा खेळापेक्षा बालपणीचे खेळ चांगले होते ते आपल्या इच्छेने चालायचे व आपण ठरवले तर कधीही तो खेळ थांबवायचो किंवा चालू ठेवायचो व अपूर्ण राहीला तर दुसर्‍या दिवशी त्याची कसर भरून काढता येते पण जीवनात आपली इच्छा नसताना आपल्याला जावे लागते  व हा खेळ आपण खरा मानतो व लहाणपणीचा खोटा पण वास्तविक हा खोटा खेळ आहे व लहाणपणिचा खरा खेळ होता काहीजण दोन्हीही खेळ खेळण्यात तरबेज असतात .बघा विचार करा व अवतीभवती कितीजण हा खेळ अर्धवट सोडून निघून गेलेत कायमचेच.
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...