मुंबईचा पाऊस
कोसळतो पाऊस मुंबईत धो धो
बघून थक्क व्हायला होते
जागोजागी भरते पाणीच पाणी
अन् ट्रफिक कायम जाम होते
पाऊस असला तरी थांबत नाही
मुंबईचे कोणते व्यवहार
मुंबईकर असतो सारखा धावत
घरच्यांना लागते मात्र हुरहूर
एकदा सुरू झाला की पाऊस
थांबायचे नावच नाही घेत
मुंबईकर खातात वडापाव
अन् घेतात आनंद मनसोक्त
ट्रेन बस मध्ये असते गर्दीच गर्दी
पाय ठेवायला नसते जागा
रिक्षा टॅक्सी मिळायची असते मारामार
उपयोग नसतो करून काही त्रागा
मुंबईचा पाऊस असतो थंडगार
भिजून त्यात मन होते शांत
कांदाभजी खाऊन मुंबईकर
आनंद घेतात मस्त
पावसात कुणी खेळतात क्रिकेट
तर कुणी खेळतात फुटबाॅल
कुणी करतात माॅर्निक वाॅक
तर कुणी खेळतात चिखल चिखल
मुंबईत पाऊसात गरीबांच्या
झोपडीत शिरते पाणी
रात्रंभर असतात जागे
विसरुन जातात जीवनगाणी
मुंबई आहे स्वप्न नगरी
येतात सर्व स्वप्न बघायला
काहींचे स्वप्न जातात पाण्यात
काही मात्र होतात मालामाल
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment