गणित
गणित कधी कळलेच नाही मला
तरी सर सांगत होते कळले असेल तुला
तो मसावी आणि लसावी जायचे डोक्यात
दोघांनी मला नाही जगू दिले मजेत
साईन थिठा अन् काॅस थिठाने खूप छळले
त्यांची आठवण काढताच अंगावर शहारे आले
गणित म्हटले की फुटतो घाम
डोक्याचा भुगा होतो जाम
गणिता शिवाय नाही राहिला प्रयाय
त्याची आवड लागेल असा शोधावा उपाय
गणितात नापास होतात बरेच जण
कारण अभ्यांसात एकाग्र करत नाही मन
गणिताचे शिक्षक असू नये रुक्ष
त्याने उडते मुलांचे गणितावरचे लक्ष
गणिताने बनते कुशाग्र बुध्दि
लोटांगन घालतात सर्व सिध्दि
गणितामुळे काहींना झोप लागते
तर काहींची झोप कायमची उडते
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment