तू नसते दिसत तेव्हा
जेव्हा नसते तू दिसत
तेव्हा होते जीवाची घालमेल
काही नसतं सूचतं
सरता सरत नाही वेळ
काय झालं असेल
उगीच मला लागते काळजी
का अडकला जीव माझा
मनावर नाही चालतं माझी मर्जी
तुला दिसताच क्षणी
जीव भांड्यात पडतो
भरकटलेल मन आता
कुठे ताळ्यावर आणतो
तुझ्याकडे फक्त अन् फक्त
मनसोक्त बघत बसावं
तुझे गोड हसणे
मनात साठवून ठेवावं
तुझ्याशी खूप बोलावसं
मनापासून वाटते
तू भेटतास क्षणी
शब्द विसरून जायला होते
तुझ्या गोड आठवणी
आहेत जीवनासाठी प्रेरणा
देऊन जातात भरपूर आनंद
नाही कळेल तुला राणा
तुझे मंजूळ शब्द
ऐकण्यासाठी होतो आतूर
पण वाट बघून बघून
थकून जातो भरपूर
Comments
Post a Comment