Skip to main content

मैत्री

मैत्री

मैत्री दिनाच्या देतो
तुम्हाला शुभेच्छा
आपण पुन्हा भेटून
करू आपल्या पुर्ण इच्छा

मैत्री म्हणजे असते
निखळ आनंद
तिला सर नाही कुणाची
होतो मनाला परमानंद

मैत्री म्हणजे असतो
शांत कोसळणारा पाऊस
त्यात चिंब भिजायला होते
अन् शांती लाभते मनास

खरी मैत्री असते
फक्त आणि फक्त निस्वार्थ
कितीही असतील परिभाषा
असतो सर्वांचा एकच अर्थ

कितीही लांब असलो
तरीही जोडलेलो असतो मैत्रीने
जीवनाला वाटतो  आधार
हे सांगू शकतो खात्रीने

सुख दु:खात देते साथ
निखळ मैत्री
सावरायला होते मदत
म्हणून लावू नये तिला कात्री

एकमेकांना कधीच नाही पाहिले
तरी होते मैत्री छान
नुसत्याच समोरच्या आवाजाने
उभारी घेते मन

खरी मैत्री कधीच
नाही तुटतं
खोट्या मैत्रीचे नाटक
एकदिवशी हमखास संपतं

मैत्री असते जीवनाचा
खरा गुणाकार
मैत्रीची बैरिज करून
तिचा करू नये भागाकार

मैत्रीला नसतो धर्म
जात आणि देश
जुळतात त्यांच्याच तारा
अन् काबीज करतात ह्रदयाचा प्रदेश

श्रीकृष्ण सुदामा आहेत
खर्‍या मैत्रीचे प्रतिक
गरीब श्रीमंत दरी ओलांडून
ती बनते तारक

प्रा. दगाजी देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...