वटपौर्णिमा
आज आहे वटपौर्णिमा
घालतील स्रिया वडाला फेर्या
नवरा आहे खरा वड
त्याच्याभोवती माराव्या फेर्या
त्याचीच करावी मनोभावे पूजा
बांधावा त्याला प्रेमाचा धागा
तुमची आठवण येताच
नाही शोधणार कोणती जागा
त्याच्यावर भरभरून करावे प्रेम
त्याला वाटावा भक्कम आधार
मिळावी त्याला जगायला प्रेरणा
त्याच्यापासून कधीच जाऊ नये दूर
त्याची अर्धांगी बनून सुख
दु:खात द्यावी त्याला साथ
उणेदुणे करावे बाजूला
करावी त्याच्याशी मनमोकळी बात
त्याच्या मनातील व्यथा कळावी
संशयाला नसावी कोणती जागा
क्षुल्लक कारणाने शब्द फेकून
करू नये कोणता त्रागा
कधी फिरवावा मायेने हात
स्पर्शाने मिटावा त्याचा थकवा
प्रेमाच्या शब्दांची करावी बरसात
त्याला कधी देऊ नये चकवा
रूचकर जेवण बनवून
शिरावे त्याच्या पोटात
जेवता जेवता भक्कम जागा
करावी त्याच्या कायम मनात
मौन कधीच धरू नये त्याच्याशी
लटका राग असावा कधीकधी
लपवून ठेऊ नये कोणती गोष्ट
बाहेर फिरायला जावे आधीमधी
करू नये तुलना त्याची कुणाशी
तोच आहे जगात सर्वश्रेष्ठ
आला तुमच्या तो नशिबी
मानू नये त्याला इतरांपेक्षा कनिष्ठ
दागिन्यापेक्षा आहे तो
जीवनाचा खरा अलंकार
वडाला फेर्या मारण्यापेक्षा
जीवनात त्याला द्यावा आनंद भरपूर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment