हरवला देव माझा
कुठे कुठे शोधले देवा मी तुला
पण सापडला नाही तेथे मला
मंदिर मज्जिद चर्चमध्ये शोधले
तेथेही नाही काही गवसले
तिर्थक्षेत्री दिल्या मी भेटी
पण रिकामीच राहिली माझी पेटी
तुझ्या नावावर झाले पुजारी श्रीमंत
जमलेल्या पैशांवर मजा मारतात मनसोक्त
जनतेच्या भावना तुडवितात पायदळी
त्यांना भरायची असते फक्त गंगाजळी
तू म्हणजे पैसे कमवून देणारा उरला
त्यांच्याठायी भक्तीभाव नाही राहिला
तुझा पत्ता आहे का कुणाला ठाऊक
लोक झालेत तुझ्याप्रती भावूक
तुझा मांडला सगळीकडे बाजार
तुझी कुठे देवा हरवली नजर
आंधळा बहिरा मुका झाला का रे तू
उभा राहून नुसता बघत राहिलास तू
गरीबांच्या वस्तीत नाही शोधत कुणी
मला वाटतं बसला असशील त्याचं ठिकाणी
ह्रदयात राहूनही तेथे नाही आम्ही शोधत
बाहेरचा बडेजावला आमचं मन भुलतं
शिकवं धडा अशा तू लोकांना
आणि खरा पत्ता सांग सगळ्यांना
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment