संध्याकाळ
घरी यावेत सर्वजण
सुखरूप संध्याकाळी
नको असावे टेंशन
कोणतेही सदाकाळी
दिवसभर चांगल्या गोष्टी
केलेल्या असाव्या लक्षात
केलेल्या दिवसभर चुका
पुन्हा करणार नाही हे ठरवावे मनात
घरी येताच वाटावा
सगळ्यांना खूप आनंद
करावी एकमेकांची विचारपूस
द्यावी सगळ्यांच्या मतांना दाद
संध्याकाळी सगळा थकवा
पळून जावा
आपल्या माणसात रमून
मनाला वाटावा गोडवा
जेवण करावे सगळ्यांनी
एकत्र बसून
आनंदाच्या गप्पागोष्टीत
टेंशन जावे विसरून
रात्री लागावी शांत
मनासारखी झोप
सकाळी उठल्यावर सगळी
कामं करावी झपाझप
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment