क्रिया आणि प्रतिक्रिया
क्रिया आणि प्रतिक्रिया सारख्याच असतात परंतु त्यांची दिशा विरोधी असते जशी आपण क्रिया केली समोरच्या दिशेने तर काही काळाने तीच प्रतिक्रिया म्हणून आपल्याकडे वापस येते आपण एखाद्याला शिवी दिली तर काही दिवसांनी कुणीतरी तीच शिवी आपल्याला कुणीतरी देणार .एखाद्याचे आपण वाईट चिंतिले तर तेच विचार परत येऊन आपले नुकसान करणार म्हणजे आपल्या प्रगतीला व नाशाला आपणच कारणीभुत असतो .आपण कुणाला संकटाच्या वेळी मदत केली तर जेव्हा आपण संकटात असणार तेव्हा कुणीतरी आपल्यासाठी धावून येणार जशी आपण सेवा केली तसा मेवा मिळतो पण हा सायन्सचा नियम लोक विसरले व विचार न करता क्रिया करतात त्याची प्रतिक्रिया तशीच येईल याचा साधा विचार करत नाही व प्रतिक्रिया आली तर मग दुसर्यावर खापर फोडून मोकळे होतात म्हणून फार सावधपणे शब्द उच्चारले पाहिजेत तसेच कोणतेही कर्म करतांना दहा वेळा विचार केला पाहिजे बर्याच वेळा अनावधानाने कर्म केले जाते तरीही त्याची प्रतिक्रिया येणारच कारण एखादे बी असचं फेकून दिले मातीत तर योग्य वातावरण मिळाले की त्याला अंकूर फुटतोच त्याचप्रमाणे मुद्दाम किंवा अनावधानाने केलेली प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ठरलेलीच असते म्हणून प्रतिक्रिया कशी येणार याचा आधी विचार करूनच क्रिया केली पाहिजे बर्याच गोष्टी आपल्या हातात असतात पण आपण बेसावधपणे वागत असतो व अविचाराने मागचा पुढचा विचार न करता कृती करून मोकळे होतो व मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपणच असतो आपल्या जीवनाचा शिल्पकार .बघा पटतं का व अनुभव घेऊन बघा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment