अनोळखीतून सुरवात पण बनते जीवनाचा आधार
जीवन जगत असतांना अनेक माणसे भेटतात बरेच अनोळखी असतात तर काहीची ओळख होते काही ओळखी नंतर मैत्रीमध्ये रूपांतरीत होतात .विशैष नातं निर्माण होते मैत्रीचे पण एक उदाहरण असे आहे की अनोळखीतून असं नातं निर्माण होते की ते आपले जीवन होते . जगण्याचा अविभाज्य भाग होतो त्याशिवाय आपलं जगण अपूर्ण राहते .ते म्हणजे पत्नीचे .लग्नाआधी तिचा व आपला काहीहीसंबंध नसतो पूर्णपणे अनोळखी पण लग्न झाल्यामुळे ती कुटूंबाचा अविभाज्य सदस्य बनते घराची लक्ष्मी बनते ..मुलांची आई बनते घरातील सून बनते तिच्यामुळे अनेक नाती तयार होतात एकवेळ आईवडिलांपासून काही दिवस दूर राहता येईल भाऊ बहिण जे लहाणपणापासून एकत्रित वाढलो आहोत त्यांच्यापासूनही लांब राहता येईल कदाचित मुले मोठे झाल्यावर मुलांपासुनही लांब राहता येते पण पत्नीपासून लांब राहणे माणसाला फार कष्टदायक वाटते व लांब राहणे ही माणसाला शिक्षा वाटते व तिलाही ती शिक्षा वाटते वास्तविक पत्नीची ओळख ही पूर्वी अनोळखीतून झालेली असते व आपल्या घरच्यांची ओळख लहाणपणापासुन असते तरी पण त्यांच्यापासून लांब राहू शकतो पण तिच्यापासून लांब जाणे त्रासदायकच दोनचार दिवस काही वाटत नाही पण त्यापेक्षा जास्त दिवस लांब राहिले की मग मन शांत राहत नाही .ही अनोळखीपासून झालेली सुरवात असते व नंतर असे नाते बनते की तोडणे महाकठिण .ज्यांचे नाते तुटले जाते ते ना घरका ना घाटका अशी स्थिती होते .वरवर ते आनंदी भासवतात पण आतून ते फार दु:खी असतात काहीवेळा अनोळखीतून नाते तयार होते त्यात स्वार्थीपणा घूसतो व प्रेम बाजूलाच राहते व रोजच मी मी तू तू ने सुरवात होते व कायम भांडणे असतात असे नाते असूनही उपयोग नसतो ते नाते ओझे बनते जगायला अशावेळी ते नाते नसलेले बरे असते व असे नाते संपले की माणूस मोकळा श्वास घेतो .बघा विचार करा की नाते घट्ट कसे निर्माण होईल व ते प्रेमावर व विश्वासावर उभे कसे राहील.
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment