विकेट पडायच्या आधी
आपली विकेट पडायच्या आधी छान जगून घ्या .हसायला कंजूषी नको मनमोकळेपणाने हसा. भटकायचे असेल तर भटकून घ्या . विकेट लवकर स्वत:हून पाडायची नसेल तर नको ते पिऊ नका .नको तेवढे खाऊ नका .जेथे जायचे नसते तेथे जाऊ नका .ज्यांना माफ करायचे त्यांना माफ करा ज्यांची क्षमा मागायची त्यांची क्षमा मागा .ज्यांची सेवा करायची त्यांची सेवा करा .ज्यांना मदत करायची त्यांची मदत करा. ज्याच्याशी बोलायची इच्छा आहे त्यांच्याशी बोला . जो छंद जोपासायचा असेल तो जोपासा . जे वाचायचे राहून गेले ते वाचा. नाचायची इच्छा असेल तर नातेवाईक किंवा मित्र यांच्या समारंभात नाचा .योगा करून काही आश्चर्य बघायचे असेल तर अनुभवा . देवाचे भजनाने काय काय आत बदल होतो तो अनुभवा .मित्रांबरोबर भरपूर गप्पा मारा जोडीदाराबरोबर तुसडेपणाने वागणे सोडा व फक्त प्रेमाने वागा. ज्यांना धडा शिकवायची इच्छा असेल तो शिकवा फक्त आपणावर कोणते संकट किंवा टेंशन येणार नाही तेवढे बघा. मौनमध्ये बसायची इच्छा असेल तर बसा .मैदानावर खेळायचे असेल तर खेळून घ्या. गाडी सायकल जे आवाक्यात आहे ते घ्या. पण हे सर्व आपली विकेट पडायच्या आधी करा कधी विकेट पडेल हे सांगता येत नाही कारण काळ हा जलद गोलंदाज आहे कधी चेंडू आपल्या बेल्स उडवील सांगता येत नाही व आपण कधी आऊट होऊ हे आजपर्यंत कुणालाच सांगता आले नाही म्हणून हूशारीने खेळणे फार महत्वाचे आहे .तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नोव्हे .जीवनाचा आनंद व्यसनामध्ये डूंबून राहणे नाही तर व्यसनापासून अलिप्त राहून आपली विकेट वाचवणे आहे.जगा आणि जगू द्या असा मंत्र अवलंबला की काम सोपं होते जीवंतपणीच मोक्ष मिळण्याचे मार्ग आहेत .ज्ञानेश्वरीत सांगितले आहे की मेल्यावरी मिळे मोक्ष असे जे म्हणती ते अतिमुर्ख. विकेट पडायच्याआधी सावध होऊ या व चांगल्या कामाकडे लक्ष देऊ या. बघू या जमतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment