हुशार व्यक्ती
शिकला म्हणून समजतो
स्वत:ला फार हुशार
पण काही संकट कोसळले की
आत्महत्येला असतो तयार
पगार गलेलठ्ठ म्हणून
मिरवतो स्वत:ला सारखा
नोकर मंडळींना मानतो तुच्छ
हुकूमत गाजवतो एकसारखा
बाहेर मारतो समानतेच्या
गप्पांची बोली
पण घरातील बायकोला
ठेवतो कायम दबावाखाली
शिकला म्हणून सर्व
पाहिजे मागेल ते हातात
दुसराही शिकला असेल
याचा विचार येत नाही मनात
शिक्षणाने आला आहे
अहंकार आणि फाजील गर्व
त्यामुळे इतरांशी वागतांना
पातळी सोडून देतो सर्व
घरात इकडची तिकडे
काडी नाही करत
पाहिजे असते सर्व हजर
स्वत:ला घरात काहीच नाही जमतं
बोलतांना काय शब्द बोलतो
याचे नाही राहत भान
ठरवलेले असते करायचा
कायम दुसर्याचा अपमान
गरीबांशी मैत्री वाटते
त्याला कमीपणाचे लक्षण
मी कसा आहे श्रेष्ठ
यात सारे जाते जीवन
अशी व्यक्ती असते
अज्ञानाचे भांडार
जीवनाचे खरे नसते ज्ञान
कारण जीवन आहे एक क्षणभंगूर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment