एक पहाट
पहाट असावी निराळी
घेऊन यावी नवीन उर्जा
दिवसभर कामाला यावी गती
काम करताना यावी मजा
पहाटेला पक्ष्यांची मिळावी
ऐकायला किलबिल
शांत वातावरणात रमून
मनात कोणती नसावी हालचाल
गायीगुरांचे हंबरणे द्यावे
मनाला आनंद
कोंबड्याची सुंदर बांग
पहाटेला असावी मनमुराद
पहाटेच्या प्रहरी घ्यावे
प्रभुचे नाम
त्याने जाईल आळस
होईल चांगले काम
योगासने प्राणायम असावा
पहाटेच्या वेळी
आजार जातील पळून
वाटेल उत्साह वेळोवेळी
पहाटेला करावे नियोजन
पूर्ण दिवसाचे
कामं होतील यशस्वी
अन् क्षण होतील आनंदाचे
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment