झोप
झोप हा छोटा शब्द आहे पण प्रत्येकाच्या आयुष्यांचा एक अविभाज्य भाग आहे .ती झोप घेतल्याशिवाय माणसाला उर्जा मिळत नाही आपणाला कितीही मोठी नोकरी असली जगातले सर्व मानसन्मान पायाखाली लोळण घेत असतील सर्वात शक्तिशाली आपण जगात असलो राष्टपती असलो पंतप्रधान असलो अब्जापती असलो जगत सुंदरी कुणी असेल तरी झोपेच्या अधीन झाल्याशिवाय जगूचं शकत नाही झोप ही माणसाला शांती प्रदान करते जगायला प्रेरणा देते दु:खावर व सुखावर एक नामी ती औषध आहे ती असेपर्यंत आपण कोण आहोत हे आपण विसरतो आपण सुखी की दु:खी हे ही आपण विसरून जातो दमून थकून आल्यावर खायला नसेल तरी चालेल पण झोप हवी कारण तिच्या स्वाधीन झाल्यावर आपण सर्व गोष्टीपासून लांब जातो व तिच्यात एकरूप होतो की आपल्या शरीराचेही आपल्याला भान राहत नाही व ती आपल्याला शांती देण्याचे काम करते .सर्व मोह माया राग लोभ पासून ती आपल्याला रोजच लांब ठेवते त्यामुळे आपण सकाळी फ्रेश होतो व कामाला लागतो पण दिवसभर आपण प्रामाणिकपणे काम केले असेल कुणाला दुखावले नसेल कुणावर अत्याचार केले नसतील भ्रष्टाचार केला नसेल कुणाला लुबाडले नसेल तरचं ती येते नाहीतर ती येत नाही व आलीच तर शांती निर्माण होत नाही म्हणून ती येण्यासाठी सर्व गोष्टी चांगल्या प्रामाणिकपणे केल्या तर ती चटकन येते व शांती देते .उठल्यावर एकदम काम करायला उत्साह येतो व जीवनाच्या अंताला अशी झोप येते की शरीराला गाडून टाकले किंवा जाळून टाकले तरी माणसाला कळत नाही व ती त्यावेळी चिरशांती प्रदान करते व त्यालाच आपण मृत्यू म्हणतो .म्हणून रोज छान झोप येण्यासाठी दैनंदिन चांगले कर्म करूया मग ती प्रसन्न होईल व आपल्याला कवेत घेऊन शांती प्रदान करेल रोजच. बघू या आपल्याला जमतं का.झोपेचा विजय असो.
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment