मी आणि माझी कविता
झाली होती तिच्याशी बालपणी ओळख
मोराची कविता ऐकताना
नंतर पावसाची कविता करायची ओलेचिंब
तेव्हा छान वाटले तिच्याशी नाते जोडताना
मग हळूहळू प्रेमाची कविता भेटली
तिच्या मी पडलो प्रेमात
सगळीकडे दिसायला लागली
कविता आणि कविता माझ्या जीवनात
तिने मला आनंदी करून
भरभरून जगायला शिकवले
दु:खावर मारते ती फुंकर
वाईट प्रसंगातून तिनेच मला सावरले
तिने मिळवून दिली मला
बायको नावाची सोबतीण
पेरला तिने जीवनात आनंद
त्याने भरून पावले माझे मन
रिकाम्या वेळी येते ती धावून
करून टाकते तो क्षण व्यस्त
सारा विसर पडतो जगाचा
अशी छान आहे कविता मस्त
तिच्यामुळे मला मिळाली
नवीन अशी ओळख
शब्द पुरविते ती मला
नाहीतर माझे ज्ञान आहे काख
कविता असेल माझ्या
कायम मनाच्या जवळ
धावून येते ती नेहमी
नाही बघत ती काळ अन् वेळ
माझ्यामुळे तिच्यावर झाले आरोप
झाली ती माझ्यामुळेच बदनाम
तरी ती नाही गेली माझ्यापासून दूर
ती ही करते माझ्यावर मनापासून प्रेम
तिचा मी कसा आभार मानू
तेच मला नाही कळतं
तिच्याशिवाय जगणे झाले कठिण
हे माझचं मला माहीत
ती आली माझ्या जीवनात
झाली ती माझे जगणे
अजून काय हवं मला
आता काहीच नाही मागणे
तिनेच दिला मला मानसन्मान
कसे विसरू तिचे उपकार
तिचं झाली माझे जीवन
कर्जबाजारी राहील तिचा जीवनभर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment