मातीचे पुतळे
आपण बघतो चौकाचौकात प्रत्येक शहरात मातीचे पुतळे दिसतात काही थोर व्यक्तींचे असतात ज्यांना बघून आपल्याला प्रेरणा मिळते काहीवेळा गणपती उत्सवात अनेक मातीचे पुतळे दिसतात मग काहीमध्ये असे तंत्र बसवतात की ते ओठ हलवतात बोलतात नाचतात गाणी म्हणतात मग आपण कुतूहलाने पाहत मजा घेत असतो व आनंद वाटतो मग उत्सव संपला की ते सर्व पुतळे मग श्रीगणेशाचा असो की संताचा असो की उंदराचा असो सर्व एकाच ठिकाणी विसर्जित करतात व शेवटी सर्वांची माती होते मग मला सांगा जेवढे सृष्टीत प्राणी आहेत माणसासकट ते पण चालते बोलते पुतळेच की त्यांच्यामध्ये असे काही देवाने यंत्र बसवले आहे की ते विचार करतात बोलतात फिरतात नवीन काहीतरी निर्मित करतात त्यांची वाढ होते शिक्षण घेतात शिकवतात अनेक गोष्टी निर्माण करतात पण देवाच्या दृष्टीने चालते बोलते फिरणारे पुतळेच मग त्यातील यंत्र बिघडले की पुतळा सर्व करायचे बंद करतो व मग त्याची शेवटी माती होते मग तो कितीही मोठा पुतळा असेना उद्योगपती असो मंत्री असो राष्टाध्यक्ष असो नोकरदार असो शेतकरी असो गरीब असो की श्रीमंत असो माणूस असो की अन्य प्राणी असो आतील यंत्र बंद पडले की सगळ्यांची फक्त माती होते दुसरे काही नाही एवढे माहीत असूनही किती अहंकार गर्व अभिमान मान पानाच्या गोष्टी रुसवे फुगवे असतात पण ह्रा सगळ्यांची माती होते . आपण देवाने बनवलेले चालते बोलते पुतळे त्याने जेवढी चावी भरली तेवढे चालणार मग त्यानंतर सगळे एकाच डब्यात माती रूपी उरणार. काही सत्य कल्पनेपेक्षा भयंकर असतात .जमिनीवर पाय राहण्यासाठी कधी कधी असा सत्य विचार करावा.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment