श्वास
जो आला की म्हणतात माणूस जन्माला आला व गेला श्वास तर म्हणतात की माणूस गेला .दोन श्वासमधील अंतर म्हणजे जीवन. जीवनात जे काही आहे ते नसतील तर आपण जीवंत राहू शकतो काही दिवस .पाणी नसेल अन्न नसेल कपडे नसतील घर नसेल अजून प्रेमाची माणसे नसतील तरीही जीवंत काही दिवस राहणार पण श्वास नसला तर एक मिनिट तर माणूस जीवंत राहू शकणार नाही म्हणजेच आपल्या अस्तिवाला किती महत्वाचा आहे पण आपण त्याच्याकडे किती लक्ष देतो दिवसभर तो कसा चालू आहे हे कधी बघितले का ?आपण लक्ष दिले काय किंवा नाही तो आपले काम करतच असतो पण त्याला बिघडण्याचे काम आपण करत असतो कारण तो जर व्यवस्थित चालू असेल तर आपले आरोग्य व्यवस्थित असते पण त्याची लय बिघडली की मग शरीराच्या तक्रारी चालू होतात त्याची गती जास्त झाली किंवा कमी झाली तरी आपल्या आरोग्याला हानीकारक आहे जास्त झाली की लगेच ह्रदयाचे ठोके वाढतात व कमी झाली ते ठोके कमी होतात तेव्हा त्यावेळी हार्टअॅटेक येण्याची संभावना असते आपल्या नाकपुडीत चंद्रनाडी व सुर्यनाडी असतात दिवसा एक नाडी चालते व रात्री दुसरी चालते त्यांचा क्रम बदलला की लगेच काहीतरी विपरीत घडते त्याची सूचना आधीच आपल्याला मिळते पण आपला तेवढा अभ्यांस नसल्याने आपल्याला समजत नाही म्हणून ज्यांचा अभ्यांस आहे त्याविषयी तेव्हा नाडीचा क्रम बदलला की ते सावध होतात व संकटातून वाचतात एकदा माझा मित्र गाडी चालवत होता व त्याला लक्षात आले की नाडीचा क्रम बदलला आहे त्याने लगेच गाडी बाजूला घेतली व दोन मिनिटात मागून आलेली गाडी झाडावर आदळली व त्या प्रसंगातून तो वाचला म्हणून तो अभ्यांस फार महत्वाचा आहे .आपण जर खोटे बोललो व ते लपवण्याचा प्रयत्न करत असलो की लगेच श्वासाची गती वाढते किंवा कुणाची भांडण झाले तसेच काही चुकीचे काम केले तर श्वासाची गती वाढते .ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला तिरस्कार आहे त्याचे चिंतन केले तरी श्वासाच्या गतीवर परिणाम होतो आणि कुणाविषयी कटकारस्थान केले तरी श्वासाची गती वाढते .कुणाला अभद्र बोललो तरी श्वासाची गती बदलते .श्वासाची गती बदलली की आपल्या आरोग्यावर परिणाम होतो छाती धडधड करते भिती वाटायला लागते अस्वस्थता वाटते कामात हूरूप येत नाही रात्री व्यवस्थित झोप येत नाही संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त होते म्हणून आपण आपलेच प्रचंड नुकसान करत असतो जेवढा शत्रू आपले नुकसान करत नाही त्यापेक्षा आपण आपलेच फार नुकसान रोज करत असतो म्हणून श्वासाचा अभ्यांस केला पाहिजे त्याची गती व्यवस्थित राहण्यासाठी प्राणायाम केला पाहिजे त्याला अडथळा येणार नाही अशा उपाययोजना केल्या पाहिजे म्हणून दिवसातून कधीतरी डोळे मिटून तो कसा आत जातो व कसा बाहेर पडतो यावर लक्ष दिले पाहिजे .आलोम विलोम कपालभारती ओंकार व तसेच त्याची गती कमी किंवा जास्त होऊ नये यासाठी दैनंदिन चांगलेच कर्म केले पाहिजे .बघा विचार करा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
7738601925
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment