Skip to main content

कितीसा उरला वेळ

आता कितीसा उरला वेळ

आता किती उरला वेळ
चांगल्या गोष्टी करण्यासाठी
बालपणी नव्हते काही कळतं
तरूणपणी भटकत होतो पोटापाण्याठी

झोप काढता काढता
गेले निघून बरेच दिवस
भरला होता पुरेपूर अहंकार
समजत होतो स्वत:ला सगळीकडे बाॅस

आजारपणात गेले बरेच दिवस
शिक्षणासाठी केली बरीच पायपीट
कुणासाठी काही करायचे राहून गेले
मी मात्र भरत होतो स्वत:चे पोट

लोकांना नावं ठेवत ठेवत
खर्च झाले बरेच वर्ष
प्रत्येकांत असतात काही चांगले गुण
ते दिसले की होतो आता मात्र हर्ष

मी मी तू तू करत करत
वाढवला स्वत:चा अभिमान
आता मात्र उरले किती दिवस
विचाराने खट्ट होते माझे मन

स्वत:साठी जगत राहिलो
दुसर्‍यांचा विचारच नाही केला
होतो आता पश्चाताप मला
वेळ राहूनही मी मात्र झोपा केला

किती वर्ष जगले याला
नसते जीवनात किंमत
किती जगला दुसर्‍यासाठी
याला महत्व असते जगात

किती आले अन् किती गेले
नावही मात्र नाही उरले
बोटावर मोजण्या इतकेच
जगात नावं मात्र राहिले

अनेकांनी केले जगावर
अनंत अनंत उपकार
जीवन झाले त्यांच्यामुळे सुखी
ते मात्र झाले होते जीवावर उदार

जागे होऊ या आपण सगळेजण
करूया चांगल्या समाजासाठी गोष्टी
झाले गेले ते विसरून जाऊ
आता दिवस घालवू सेवेसाठी

प्रा. दगाजी देवरे

Comments

  1. Sir u r really a multitasker
    U r my maths teacher
    Ur poems r truly amazing
    U r my idol now

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...