यज्ञ
यज्ञ म्हणजे आपल्याला आठवते तो कुंड आणि कुंडामध्ये विविध वनस्पती तूप मंत्रपठण व तेथून निघणारा धूर असे काही चित्र दिसते पण मला ते असे काही अभिप्रेत नाही .सरळ साध्या भाषेत यज्ञ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या मते इतरांनी सहमत व्हावे ही कोणतीही अपेक्षा नाही .आपण घरी किंवा बाहेर काहीतरी खात असतो पण काहीजणांचे मत असते की आपण पैसे मोजतो तेव्हा जेवढे खायचे तेवढे खायचे बाकी टाकून द्यायचे मग याला यज्ञ म्हणता येणार नाही .तुम्हांला जेवढे खायचे तेवढेच घ्या व मनापासून ते खा नाहीतर आपण खात असतो व त्याबरोबर याला शिव्या त्याला दे .नको ते विषय उकरून काढणे तेव्हा जेवतांना आनंद मिळत नाही ते फक्त पोटात अन्न ढकलणे .ज्यावेळी आपण मनापासून खात असतो व अन्नाला धन्यवाद देत असतो व पाहिजे तेवढेच खातो व अन्नाचा सन्मान करतो तर खाणे हा ही यज्ञनच समजावा नाहीतर असते फक्त उदरभरण तसेच काय बोलावे किती बोलावे व कुणाजवळ बोलावे हे पण यज्ञनच म्हणावे लागेल .त्याचप्रमाणे आपल्या वाटेला आलेले दैनंदिन काम प्रामाणिकपणे करणे म्हणजे यज्ञनच होय .जे आपण ऐकतो ते काय ऐकतो व ऐकल्यावर मनात शांती निर्माण होत असेल तर तो ही यत्नच होय .कुणाला मदत करतो व कुणाची मदत घेतो याचा विचार करून योग्य निर्णय घेणे म्हणजे यज्ञ म्हणावा लागेल .सर्व परिस्थितीत सम राहणे हे यज्ञनापेक्षा नक्कीच कमी नाही .दया क्षमा आणि शांती हे तीन गुण आपल्यात विकसित करणे यापेक्षा कोणता मोठा यज्ञ नाही .अडचणीच्यावेळी धावून जाणे निस्वार्थपणे हा पण एक यज्ञच होय .कोणतीही गोष्ट करताना त्याची परतफेड मिळावी अशी अपेक्षा करणे म्हणजे तो यज्ञ नाही.चांगल्या विचारांचे चिंतन मनन करणे व जीवनात त्यांची अंमलबजावणी करणे हा फार मोठा यज्ञ समजावा .आपण जे करतो ते आपण स्वत: करत नसून कुणीतरी आपल्याकडून करून घेतो चांगली गोष्ट अशी भावना म्हणजे यज्ञच समजावा .जे जे वाईट करतो ते फक्त स्वत:मुळेच झाले त्याचे खापर दुसर्यांवर न फोडणे हा तर मोठा यज्ञच आहे आईवडिलांची सेवा करणे यापेक्षा मोठा कोणताही यत्न नाही हे सर्व करण्यासाठी स्वत:ला मजबूत ठेवणे मानसिक व शारिरीक दृष्टीने हा पण एक यज्ञच आहे त्यामुळे दैनंदिन जीवनात आपल्याला यज्ञ करता करता जीवन जगणे आनंदी होईल व त्यामुळे आपल्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होईल .संकुचित वृतीतून विशाल दृष्टी निर्माण होईल आणि त्याचे अनुभव स्वत:लाच येऊ लागतील बघा विचार करा
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment