कमीतकमी एक कुणीतरी हवं
गांधीजी म्हणायचे माझ्याबरोबर एक कुणीतरी विश्वासाचा माणूस हवा मग मी वाट्टेल तेथे जायला तयार आहे व काहीही करू शकतो म्हणजेच माणसाला कुणीतरी हक्काचे माणूस हवं की ज्याच्यावर स्वत: पेक्षा जास्त विश्वास हवा आपल्या सुखदुखाच्या गोष्टी त्याच्याशी share करता आल्या पाहिजे व प्रश्नांना उत्तर सापडले पाहिजे मग ती व्यक्ती बायको असू शकते भाऊ असू शकतो बहिण असू शकते आई वडिल असू शकतात मित्र असू शकतो मैत्रिण असू शकते.आपल्या मनात चाललेली व्यथा त्याच्याजवळ सांगता आली पाहिजे व मन मोकळं करता आले पाहिजे उद्या कितीही वितूष्ट आले दोघांमध्ये तरी त्याच्या विश्वासाला तडा जाता कामा नये त्याच्या गुप्त गोष्टी तशाच राहिल्या पाहिजे आपल्याला ठेच लागल्यावर त्याच्या डोळ्यांत पाणी यायला हवं आपले त्याच्याशी बोलणं झालं नाही की हूरहूर लागायला हवी तो दिसल्यावर जीवन जगायला प्रेरणा यायला हवी त्याच्या नुसत्या आवाजाने जीवन जगताना धीर यायला हवा त्याच्या शब्दाने संकटांना सामोरे जाण्याची हिंमत यायला हवी पण काही वेळा तसा माणूस निवडण्यात चूक होते कारण आपल्या सर्व गोष्टी त्याला सांगतो व तो त्याच गोष्टींचे भांडवल करून तो आपल्या विरोधात जातो व आपले पितळ उघडे पाडतो अशी फसवणूक होऊ शकते त्यामुळे तसा माणूस निवडतांना अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवू नये नाहीतर फसवणूक ठरलेली असते त्यापेक्षा नसला असा माणूस तरी चालेल पण ज्याच्याजवळ असा विश्वासू माणूस असेल तो खरंच भाग्यवान म्हणता येईल त्याच्या पायाशी सुख लोळण घेतात जर नाही असा मिळाला माणूस तर देवालाच बनवा व त्याच्याशीच हितगूज करा .बघा विचार करा व असा माणूस निवडा व आपणही कुणाच्या विश्वासाचे पात्र बनूया .
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment