विवेक म्हणजे भावनाशून्य नव्हे
असे म्हणतात की माणसाजवळ विवेक पाहिजे पण ती साधी गोष्ट नाही की एखाद्या दुकानात जाऊन विकत आणायची त्यासाठी मोठमोठ्या लोकांनी जीवन पणाला लावले व कुठे तो विवेक त्यांच्यात आला. भावनाशून्य म्हणजे विवेक नव्हे त्या भावनेच्या पार जाऊन जी स्थिती निर्माण होते ती म्हणजे विवेक. मनाला मुरड घालून एखादी गोष्ट न करणे म्हणजे विवेक नव्हे त्या गोष्टीबद्दल चांगले किंवा वाईट काहीच न वाटणे विवेक.ती गोष्ट असली किंवा नसली तरी मनाचा समतोल राहणे म्हणजेच विवेक .समोर एखादी गोष्ट आहे व ती आपल्याला खूप आवडते पण लोक काय म्हणतील त्या दबावापोटी आपण लांब राहतो तिचा त्याग करतो म्हणजे विवेक नव्हे . त्या गोष्टीबद्दल आकर्षण नसणे म्हणजे त्या आकर्षणाच्या पलिकडे गेलेली अवस्था म्हणजे विवेक असेल .एकाच गोष्टीमध्ये अडकून त्यातूनच क्षणिक आनंद मिळवत राहणे व नाही मिळाली एखाद्या दिवशी ती गोष्ट तर मग दु:खी होणे अशी अवस्था अविवेकी आहे .जरी नाही मिळाली ती गोष्ट तरी मन शांत असणे म्हणजे विवेक. आपला आपल्यावर ताबा .आपला रिमोट आपल्या जवळ. आपण सुखी की दुखी हे आपण ठरवणार. समोरची व्यक्ती नाही की समोरची परिस्थिती नाही म्हणजेच विवेक अंगी आला असे म्हणायला हरकत नाही.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment