बाळाचे मनोगत
आई मी आहे तुझा
पोटचा गोळा
कधी नको करू मला
तुझ्यापासून वेगळा
धावीन मी तुझ्यामागे
पदर धरून दुडदुडा
नको करू पदर दूर
नाहीतर होईल मी वेडा
तु बनवलेले अन्न
असते फार चविष्ट
नाही सर येईल त्याला
सगळ्यांपेक्षा असते ते बेस्ट
नको दाखवू मला
कधी पाळणाघर
असतो मी तेथे उदास
तुझी तेथे आठवण येते फार
आई तुचं माझे विश्व
आणि तूचं माझे जगणे
तुझाच असतो जप
तुचं हवी हेच माझे मागणे
कामावरून नको करू
यायला कधी उशिर
डोळे लागतात वाटेकडे
तुला भेटण्यासाठी होतो मी आतूर
असतील कितीही खेळणे
माझ्याकडे भारी
तुझ्याशिवाय आई मी
असेन कायम भिकारी
आई तूचं माझा देव
आणि तूचं माझे सर्वस्व
नाही देणार कधी त्रास
तुझ्या हाताने मला भरवं
तुझ्या कुशीत जाणवतो
मला पृथ्वीवरचा स्वर्ग
होते मन माझे शांत
नाही शोधावा लागत दुसरा मार्ग
तुचं माझे हसणे आणि
तूंच माझे रडणे
तुझ्याशिवाय नको मला काही
हेच देवाकडे माझे मागणे
प्रा.दगाजी देवरे
Comments
Post a Comment