दिवाळी
गेले दिवाळीचे दिवस आता
उरल्या फक्त आठवणी
एकमेकांकडे कुणी जात नाही
अहंकार भरला आहे मनी
सगळ्यांचे तोंड दाही दिशेला
स्वत:ला समजतात श्रेष्ठ
रागाला केले सगळ्यांनी जवळ
दुसरा दिसायला लागला कनिष्ठ
हसून चर्चा करण्याची मैफिल
आता सगळी संपली
कुणाची तरी लागली दृष्ट
म्हणून नाती वाहून गेली
पैसा आला सगळ्यांच्या जवळ
नाही राहिली कुणाला कुणाची गरज
पण पैसा नसतो सर्वकाही
दुर झाला पाहिजे हा गैरसमज
प्रेमापेक्षा झाली भेटवस्तू
जीवनात अधिक मोलाची
नाही मिळाली मनासारखी
मग वाट लागते नात्याची
मी आणि माझा संसार
हा झाला विचार स्वार्थी
त्यामुळेच होते सारी गडबड
बनून उपयोग नाही परमार्थी
मनाने जातात माणसे लांब
असतो एक शकुनिमामा
भरते कान मंथरा
माणूस बनतो नात्यातून रिकामा
येते दिवाळी जाते दिवाळी
पूर्वीचा आनंद ओसरला
आता आली दिवाळी
फक्त उरली म्हणायला
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment