एक प्रयोगशाळा चालती बोलती
प्रयोगशाळेमध्ये अनेक प्रयोग केले जातात व ते सिद्ध केले जाते मग एकदा सिध्द झाले की माणसाचा त्यावर विश्वास बसतो पण दैनदिन अशा काही अनेक गोष्टी आहेत की त्या आपण आपल्यावर प्रयोग करून स्वत:च सिध्द करू शकतो व त्यानुसार आपल्यात आपण बदल घडवून चांगले व्यक्तिमत्व बनवू शकतो उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा रागामुळे आपली मानसिक स्थिती कशी होते व आत अशांतता कशी निर्माण होते व रागाच्या भरात मनावरचा ताबा कसा सुटतो याचा स्वत:च्या शरीरावरच अनेकदा प्रयोग करून झाला असेल पण प्रयोग म्हणून त्याचा अभ्यांस केल्याचा दृष्टिकोन नसल्याने त्याचे अनुमान आपण काढले नाही त्यामुळे तो राग आपल्याला बाहेर काढता आला नाही तसेच हसण्याने व हसवण्याने आपण किती उत्साही होतो व समोरचाही व आपल्या आत कसे वाटते याबद्दल आपल्याशिवाय कोण चांगले सांगू शकणार ? दुसर्याला मदत केल्याने त्याचा चेहरा प्रसन्न बघून आपल्याला आत कसे वाटते ते आपल्याला जास्त माहीत असते तसेच जागरण केल्याने किंवा झोप व्यवस्थित झाल्याने आत कसे वाटते याचा आपण अभ्यांस करू शकता तसेच खोटे बोलण्याने खरे बोलण्याने कशा भावना निर्माण होतात व त्याप्रमाणे आपली वागणूक सुधारली पाहिजे असे अनेक उदाहरणे आहेत की त्याचा प्रयोग आपल्याला स्वत:वर करून योग्य अयोग्य परिणामांचा अभ्यांस करुन त्याप्रमाणे बदल करून घेता येतील .दैनंदिन कामं प्रामाणिकपणे केलीत किंवा अप्रामाणिकपणे केलीत तर आत कशा भावना तयार होतात त्याचा अभ्यांस करून छान भावना ज्यामुळे तयार होतात ते काम करायला हरकत नाही व त्या भावनामुळे समाजाचेही नुकसान होणार नाही किंवा कुणाला हानी पोहचणार नाही किंवा आपल्यामुळे कुणी दु:खी होणार नाही याचाही विचार केला पाहिजे तसेच काय खाल्याने आपल्याला कोणता त्रास होतो ते आपण टाळले पाहिजे कसे बसलो कसे चाललो कसे बोललो कसे झोपलो याचाही अभ्यांस करून ज्यामुळे चांगले वाटते ते करावे त्यात स्वत:ला व इतरांना फायदा झाला पाहिजे.काय वाचले म्हणजे आत शांती निर्माण होते किंवा काय बघितले म्हणजे आत कालवाकालव मनाची होते याचा अभ्यांस करून चांगले बघितले पाहिजे व चांगले वाचले पाहिजे म्हणून आपले शरीर शरीर नसून एक चालती बोलती प्रयोगशाळा आहे व त्यात असे अनेक प्रकारचे प्रयोग करून स्वत:मध्ये बदल घडवून चांगले व्यक्ती बनता येईल आपल्याला .मग सुरवात करू या त्या पद्धतीने बघायला व जमतं का बघू या आपल्याला
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment