विधात्याचे मोठं घर
विश्वाचा पसारा हा अफाट आहे ज्याचा आपण विचारही करू शकत नाही .एवढ्या मोठ्या विश्वामध्ये एक छोटीसी पृथ्वी आहे की इतर काही ग्रहापेक्षा अगदीच छोटी आहे .तिच्यापेक्षा अनेक पटींनी मोठे ग्रह आहेत. विश्वाच्या दृष्टीने नगण्य स्थान तिचे आहे म्हणजे एवढ्या विश्वामध्ये तो पृथ्वीरूपी टिंब नष्ट झाला तरी काहीएक फरक पडणार नाही . हिच पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपण अंतराळात अंधातरी आहोत व आपण तिच्याबरोबर फिरतो आहोत पण आपल्याला हे काहीच जाणवत नाही पण हा पृथ्वी ग्रह निर्माण तरी कशाला झाला असेल व मग तिच्यावर हा वेगळाच पसारा चालू झाला पण माणूस हा विचार कधीच करत नाही व छोट्या गोष्टींचे टेंशन मात्र घेत असतो वास्तविक आपले अस्तित्व विश्वापुढे नसल्यासारखेच आहे .विश्वामध्ये भरपूर पोकळी आहे .हे सर्व ग्रह तारे राहूनही ती पोकळी कितीतरी शिल्लक आहे म्हणजे त्या निर्मात्याचे एवढे मोठे घर की ज्यात एवढा पसारा राहूनही घर मोकळचं दिसते घरामध्ये पोकळीच पोकळी मग त्याघरामध्ये एक अंधारी खोली आहे त्यात ज्या ग्रह तारे यांचे वय झालं आहे त्यात ढकलले जातात ज्याला ब्लॅक होल म्हणतात .एक दोन ग्रहापर्यंत माणूस पोहचला .पण पसार्याकडे बघितले विश्वाच्या तर डोकं सुन्न होते व सहजच विचार येतो कशाला मांडला असेल हा पसारा .निर्माण करायचे व नंतर नष्ट करायचे मग हा खेळच झाला की पण हा खेळ म्हणून खेळला तर मजा येते पण हा खेळ म्हणजेच मी आहे असे समजले तर मग माणूस अडकत जातो व त्यातून कधीच सुटका होत नाही मरेपर्यंत .हा खेळ का मांडला याचे उत्तर कुणाकडे नसावे .खेळामधील आपण खेळाडू फक्त खेळत राहायचे व खेळ म्हणूनच त्याकडे पाहावे व जिंकण्याचा प्रयत्न करावा पण किती बारीक गोष्टीमुळे आपण टेंशन घेतो .ट्रेन लेट झाली बस लेट होते हा असं बोलला याचा बदला घेईन त्याला धडा शिकविन जमिनीबद्दचे भांडणे संपत्तीचे भांडणे इतर कारणावरून भांडणे ह्रा सर्व मोठ्या मानलेल्या जाणार्या गोष्टी एका लहानशा पृथ्वीवर चालू आहैत की ज्या पृथ्वीलाही एकदिवस अंत आहे .विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे खूश रहा आनंदी राहा .भरपूर खेळा .समोरच्यालाही आनंद द्या आपणही आनंदी राहू व हा खेळ असाच चालू राहणार फक्त खेळाडू बदलत राहतील पण खेळ मात्र तोच.
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment