भाऊबीज
प्रत्येक भावाला असावी
एकतरी जीवाभावाची बहिण
प्रत्येक बहिणीला पाहिजे
भावाचे हक्काचे ठिकाण
नसाव्यात त्यांच्यात कोणत्याही
प्रकारच्या कुरबूरी
असावे निस्वार्थ प्रेम
मग पडणार नाही दरी
एकमेकांच्या संसारासाठी
असाव्यात शुभेच्छा
सगळेजण सुखी राहावेत
ही करावी मनापासून इच्छा
भाऊबीज आहे भाऊबहिणींचा
प्रेमाचा सण
गप्पागोष्टी माराव्यात हेवेदावे
सगळे मात्र विसरून
आईच्या पश्चात असते
बहिण आईच्या ठिकाणी
तिच्या मायेखाली वाटावी शांतता
तिला भेटताच आनंद वाटावा मनी
फक्त आणि फक्त ओवाळून
घेण्यासाठी नसावी बहिण
एकमेकांच्या दु:खाच्या वेळी
धावून जावे सगळे सोडून
ज्याला नसते बहिण
त्याने एकतरी मानलेली असावी
जीला नसतो भाऊ
तिनेही मानलेल्या भावाची इच्छा धरावी
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment