कर्मधर्म
रोज दैनंदिन जीवनात आपल्या वाट्याला अनेक प्रकारची कर्म येत असतात .काही आपण ओढवून घेतो तर काही आपोआप येतात .काही कर्म करताना आपण जबरदस्तीने करत असतो तर काही प्रेमाने करत असतो काही जणांवर जबाबदारी फक्त स्वत:ची असते काहींवर कुटूंबाची असते काहीवर नातेवाईकांची असते काहीवर एखाद्या संस्थेची असते काहीवर एका शहराच्या विशिष्ट भागाची असते काहीवर संपूर्ण शहराची असते काहीवर तालूक्याची असते काहीवर जिल्हांची असते काहीवर राज्याची असते काहीवर देशाची असते काहीवर जगाची असते अशा प्रमाणे जबाबदारी पार पाडत कर्म चालू असते .नियतीने आपल्यावर कोणत्या जबाबदारीसाठी नेमले आहे त्याचा विचार करावा .आपल्याला असलेले काम इतरांच्या मानाने किती क्षुल्लक आहे व तरीही ते काम आपल्याला नियतीने दिले आहे म्हणून आपल्याला जीवंत ठेवले आहे असा विचार करून काम चांगल्या प्रकारे कसे करता येईल याचा विचार केला तर मग आपल्याला कंटाळा व मुद्दाम मलाच का दिले असे वाटणार नाही व मलाच मुद्दाम दिले असे वाटले तर तेव्हा ते काम धड होत नाही व त्यातून आपल्याला आनंदही मिळत नाही म्हणून दैनंदिन जीवनात त्या कामासाठी आपणच श्रेष्ठ आहोत असे नियतीला वाटते म्हणून आपल्या वाट्याला ते काम आलेले असते पण अशावेळी आपला इतरजण वापर तर करत नाही ना याकडेही लक्ष द्यायला हवे .जे लोक सतत कामचुकारपणा करतात त्यांनी विचार करावा की आपल्याला जो पगार मिळतो त्या मोबदल्यात आपण खरचं कामाला न्याय देतो का ? शेवटी जे काम जसे केले त्याचे फळ तर ठरलेले असते तेव्हा कामाबद्दल सकारात्मक विचार केला तर त्यातून आनंद तर मिळेलच व फळही चांगले मिळेल आणि दिवस रात्र ही आनंदात जाईल तसे कोणतेही काम हे हलक्या किंवा उच्च प्रतीचे असे काहीही नसते. काम हे काम असते व ते चांगल्या प्रकारे कसे होईल याचा विचार करावा.बघा असा विचार करून व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment