Skip to main content

हिमाचल ट्रीप

शेवटचा दिस गोड झाला

जेव्हा केली होती हिमाचल बुकींग
तेव्हा कुणीच नव्हते ओळखीचे
आलो आम्ही हिमाचलमध्ये
झाले आमचे नाते मैत्रीचे

घरापासून लांब राहून
रमलो या मित्रांमध्ये
घेऊन जाणार चांगल्या आठवणी
जपून ठेवू  कायम मनामध्ये

देशमुख सरांचे छान बोलणे
राहील कायमचे लक्षात
जेवण होते त्यांचे रूचकर
राहील चव त्याची मनात

शक्य  झाले तेवढे  दिले
सरांनी  आपल्या सर्वांना
आपणही समजून घेतले
सर्व परिस्थिती बघून सरांना

हाॅटेलची निवड सरांनी
खूप छान प्रकारे केली
प्रशस्त रूम व तेथील सुविधा
आम्हांला फार आवडली

रोज नवनवीन पदार्थाची
चवच होती न्यारी
आपल्या आवडी निवडीना
जपायची असायची त्यांची तयारी

रोहीत आणि सवंगडी
यांचे मानू या आभार
चहापाणी जेवण  देत होते
आम्हाला ते वेळेवर

जादूगाराची जादू बघून
झालो आम्ही अचंबित
थकलेल्या जीवांना तुम्ही
नवीन उर्जा दिलीत

सर एवढ्या वयात
तुमचा उत्साह आहे दांडगा
तीच प्रेरणा घेऊन
झुगारून दूऊ आम्ही आळशाचा गारवा

विशालसरांसारखा मुलगा लाभला
हे आहे सरांचे भाग्य थोर
असे प्रेम दिसणे झाले दुर्मिळ
दिसतात लोक एकमेकांपासून दूर

राहील आम्हांला चंदीगढ
चांगलेच लक्षात
सिमला आणि मनाली येथील थंडी
चांगलीच भरली आमच्या मनात

बसच्या चालकांना  देवू या
मनापासून  धन्यवाद
छान चालवली त्यांनी बस
सर्व संकटांना दिला त्यांनी छेद

हाॅटेल मालकांनी केले
चांगलेच आपल्याला सहकार्य
मनाला झाला चांगला आनंद
बघून आजूबाजूचे सौदर्य

टक्के आणि फॅमिली यांच्याबरोबर
घट्ट झाले आमचे नाते
जणू काय खूप दिवसांची मैत्री होती
असे आज मला खरंच वाटते

प्राजक्ताचा वाढदिवस आणला
सरांनी घडवून
खूप आनंद दिला
छान केक बनवून

कायम  संपर्कात राहण्यासाठी
घेऊ या एकमेकांचे नंबर
वाटू या सुखदु:खाच्या गोष्टी
नको जाऊ या एकमेकांपासून दूर

सर तुमच्या बरोबर आम्हाला
यायला अजून आवडेल
तुमची येईल आम्हाला  आठवण
तुमची शिस्त अन् विचार उपयोगी पडेल

हट्टाहास याजसाठी आम्ही
होता केला
सर्व संकटावर मात करून
शेवटचा दिवस गोड झाला

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...