शांती व समाधान
शांती आणि समाधान आहे
एक छान जोडी
एकमेकांशिवाय आहे ते अधूरे
नाही करत एकमेकांवर कुरघोडी
जेथे असते वास्तव समाधानाचे
तेथे नांदायला जाते शांती
शांती असते ज्या घरी
त्या घरात नसते कशाची भ्रांती
ज्या घरात शांती त्या घरी
भरते लक्ष्मी पाणी
जेथे असते लक्ष्मी
तेथे असतो उभा चक्रपाणी
जेथे असतो तो परमेश्वर
ते घर सुखाचे आगर
तो प्रदान करतो सौख्य समृद्धी
म्हणून करावा त्याचा जागर
हे सर्वजण घरी येतात
एका समाधानाने
म्हणून वृती ठेवावी समाधानी
आनंदी राहावे कायम मनाने
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment