देवा तु काहीच करू शकत नाही?
अरे समाजाला चांगल्या लोकांची खूप गरज आहे .पण चांगल्या विद्वान लोकांनाच आयुष्य जास्त नसते हे वेळोवेळी सिद्ध झाले .शिवाजी महाराजांना अवघे 50 वर्ष आयुष्य लाभले अनेक संतानी समाजासाठी भरपूर काही केले पण त्यांनाही आयुष्य जास्त लाभले नाही .संभाजी महाराज यांच्यावर अन्याय झालेत तेव्हा तू उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहिला अनेक स्वातंत्रवीरांनाआपल्या प्राणाला मुकावं लागले तेथेही तू हस्तक्षेप केला नाही राजकारणात अनेक चांगल्या लोकांना आयुष्य खूप कमी मिळाले पंडीत नेहरू राजीव गांधी इंदिराजी लाल बहादूर शास्री भगतसिंग सुखदेव राजगुरू विवेकानंद रामानुजन श्रीकांत जिचकार साहेब प्रमोद महाजन विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे साहेब असे असंख्य नावं सांगता येतील की ज्यांची समाजाला खूप गरज होती पण ते फार लवकर गेलेत .मग मला सांग देवा तुझ्या हातात त्यांना थांबवण नव्हतं का? तू काहिच कसं करू शकला नाहीस? मग यामागे काय कारण असेल की गुंड मवाली वाईट लोकांना खूप आयुष्य लाभते व चांगल्या लोकांना नाही .याचे उत्तर त्यांच्या आयुष्यांची दोरी तेवढीच होती असे सांगून मोकळे होऊ नकोस .ही दोरी किती लहान व मोठी हे कुणी ठरवलं व कशाच्या आधारावर ठरवलं याचे शास्रीय उत्तर कुणाकडेच नाही व तुझ्याकडेही नसेल व त्याचा जाब कुणाला विचारणार ? आत्म्यास शांती मिळो असे बोलणेच आमच्या हाती उरते त्यापलीकडे काहीच करू शकत नाही .एवढे हुशार माणसे क्षणात नाहीशी होऊन जातात व त्याचा गुन्हा कुणाकडे नोंदवावा ?सर्वच प्रश्न उत्तराशिवाय आहेत .तुझ्यापेक्षाही कुणी आहे का वरती की तो हे ठरवत असतो आपल्या मर्जीप्रमाणे.बघ विचार कर व जमलं तर पटवून सांग सत्य
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment