कर ठेवोनिया कटी
कर ठेवोनिया कटी आहे तु उभा
दमलास का रे तु विठ्ठला
वर्ष किती सरले उभे राहून
देत आहे दर्शन तु अवघ्या जनाला
विसरतात लोकं दु:ख तुझ्या दर्शनाने
विठ्ठल विठ्ठल करतात मुखाने जप
तुझ्या भेटीसाठी होतात आतूर
तुझ्या दर्शनाने मिटतात पापं
येऊ दे देवा पाऊस भरपूर
हिरवे हिरवे कर रानोमाळ
भरू दे शेतकर्यांचे धनधान्याने घर
हे सर्व करण्यासाठी काढं थोडा वेळ
तुझ्या नामाने होतात लोक वेडे
नाचून गाऊन होतात भजनात दंग
असे कसे रे तुझे नाम गोड
विठ्ठल विठ्ठल म्हणत होतात गुंग
तुझी भक्ती आहे जीवनाचे सत्य
पण लोकं अडकतात संसारात
भोगतात सुख अन् दु:ख अपार
भक्त करतात सर्वांवर मात
विठ्ठल विठ्ठल नाम हे जपावे
शांती येईल ह्रदयात वस्तीला
येईल विठ्ठल तेथे धावत
शोधत येईल तो शांतीला
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment