मुलगी व बहिण प्रत्येकाला हवीच पण
आजकाल मुलांपेक्षा मुलगी हवी असे प्रत्येकाला वाटते तसेच बहिणही हवी पण समाजामध्ये अनेक ठिकाणी परिस्थिती विचित्र दिसते आपली मुलगी तसेच बहिण कितीही चांगली असेल आपल्याशी नात्याने पण आपला जावई व बहिणीचा मालक तसा असेलच असे नाही बर्याच ठिकाणी काहिंना फक्त मुली आहेत पण त्यांचे लग्न झाल्यावर त्यांचे नवरे असे काय विचित्र असतात सांगता सोय नाही अनेक छोट्या गोष्टीचे मोठ्या गोष्टी करतात मानपानाचे नाटक असते थोडाही मानपान झला नाही तर राग लगेच येतो व मग आपल्या मुलीला व बहिणीला माहेर पोरके करतात अनेक गोष्टी कानात कोंबून मत बदलून टाकतात किंवा दबाव टाकून त्यांचे माहेर तोडतात किंवा माहेरच्या लोकांचा उध्दार करतात मग आईबाप तर मुलगी माहेरी येत नाही तिचा नवरा संबंध ठेवू देत नाही अशा विचाराने बेचैन होतात .धरती आत घेईल का अशी स्थिती निर्माण होते व बिचारीचा कोंडमारा होतो त्यामुळै आईवडिल मुली असूनही अनाथ होतात म्हणून मुली हव्यातच पण त्यांचे नवरे लायकीचे तसैच समंजस असतील तर ठिक नाहीतर मग काहीही खरे नसते .नवरा झाला म्हणजे काय तो तिचा बाॅस नसतो तर सहचारी असतो पण नवरेगिरी मिरवण्यात काहींना धन्य वाटते असे लोक विसरतात की आपल्यालाही मुली आहेत पण अज्ञान अहंकार जीवनाचे नसलेले ज्ञान स्वत:विषयी गैरसमज व आपण कुणीतरी ग्रेट आहोत असा फाजील विश्वास व त्यामुळैच असे वागतात .समाजात नजर टाकली तर निदान 50% तरी असे दिसेल
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment