शेवटचा दिस गोड व्हावा
होता आहेत तुम्ही निवृत्त
देतो पुढच्पा वाटचालीला शुभेच्छा
असावेत कायम आनंदी
अशी करतो मनापासून इच्छा 1
होता तुमचा मोठा dept.ला आधार
होईल आमची आता तारांबळ
कसं आम्ही आता सावरू
त्यासाठी जाईल बराच काळ 2
तुम्ही होत्या म्हणून नव्हती
कोणती आम्हांला चिंता
होत होते सगळे कामं
पण टेंशन आले आम्हांला आता 3
सगळे मुले अन् पालक
होते तुमच्यासाठी समान
कुणावरही केली नाही मेहरबानी
दिला सगळ्यांना न्याय एकसमान 4
पेपरमधील कोडं सोडवता
तुम्ही न चुकता दररोज
जीवन जगायचंही कोडं सुटले असेल तुम्हांला
वाटते तुमच्याकडे बघून आज 5
बोर्ड आॅफ स्डडिज चिफ माॅडरेटर
कोआॅर्डिनेटर परिक्षा कमिटी अशी विविध पदे तुम्ही भुषविली
सगळीकडे प्रामाणिकपणा दाखवून
त्या पदांची मान तुम्ही उंचावली 6
काॅलेजमध्ये सल्लागार म्हणूनही
अनेक जणांचा केला फायदा
त्या सल्ल्यांचा जीवनात उपयोग करू
असा करतील बरेच जण तुम्हांला वायदा 7
तुमच्या प्रेमळ स्वभावाने तुम्ही
निभावली सगळ्यांशी मैत्री
पण प्रसंगी रोखठोक बोलून
पटवून दिली चांगल्याच विचारांची खात्री 8
तुमचे अस्तित्वच देऊन जायचे
आम्हांला भारी शक्ती
आमच्या अस्तित्वासाठी सांगा ना
कुणाची करावी आम्ही भक्ती 9
तुम्ही आहेत maths dept.ला
होईल तो आता भूतकाळ
तुमच्या जाण्याने विचार करतो मी
कसा असेल आमचा भविष्यकाळ 10
परिक्षेच्या कामात होता तुमचा
वाटा नेहमी सिंहाचा
कुणावरही नाही केला अन्याय
कारण विचार करत होते सगळ्यांचा 11
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी
वापरला विविध फंडा
अनेक पदे तुम्ही सांभाळून
दिमाखात फडकवला रूपारेलचा झेंडा 12
तुम्ही निघालात पुढच्या प्रवासाला
जरा थांबा पुढच्या स्टेशनवर
तुमच्या मैत्रिणीही येता आहेत मागोमाग
त्यासाठी वाट पहावी लागेल महिने जून ते डिसेंबर 13
तुमच्या मैत्रीणींना वाटेल
उद्यापासून तुमचा हेवा
कारण पाच तासांचे टेंशन नसल्याने
तुम्ही खाणार घरी शांतीचा मेवा
कोण चुकलं अन् कोण बरोबर
हे आज आपण विसरून जाऊ
तुमच्या आशिर्वादाने dept ची
प्रगती आम्ही करत राहू 15
चुकलं माकलं असेल तर
या अज्ञान माणसाला माफ करुन जा
जाता जाता आशिर्वाद
मात्र आम्हांला देऊन जा16
पुढे उभे राहून dept.ला आलेले प्रश्न
तुम्ही एकटे झेलायचे
प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मात्र
तुम्ही नेहमी मिळवायचे 17
तुमच्या चांगल्या विचारांची
येत राहील नेहमी आठवण
तेच विचार पुढे नेऊन
करू चांगल्या गोष्टींची साठवण 18
होते जरी मौन माझे तरी
ठेवत होतो तुमची खबर
दिसल्या नाही एखाद्या दिवशी
तर वाटायचे कुठे गेल्या असतील बरं 19
तुमच्या निवृतीने निर्माण होईल
dept.ला मोठी पोकळी
ती भरून निघणे अशक्य असे
वाटते मला वेळोवेळी 20
जीवनभर केली फार दगदग
घ्या विश्रांती आता भरपूर
नको आता कशाची चिंता
जाईल जीवन तुमचे सुखकर 21
तुमच्या मैत्रिणींना स्वत:ला
सावरणे जाईल आता कठिण
रोज काहीतरी विषयाने
काढतील तुमची गोड आठवण 22
तुमच्या डब्यात असायचे
रोज नवनवीन बनवलेले पदार्थ
तुमच्या मैत्रीणी मुकतील त्याला
पण शोधून सापडणार नाही त्यांना दुसरा मार्ग 23
तुमच्या मैत्रींणीचा ग्रूप बघून
वाटते माणसाला हवेत असेच मित्र
मित्रांशिवाय माणूस असतो अधूरा
त्यांच्यामुळेच माणूस आनंदी राहतो मात्र 24
निरोगी भरपूर आयुष्य मिळो तुम्हांला
अशी करतो देवाकडे प्रार्थना
ती पूर्ण होईलच अशी आहे
माझी त्याच्याकडे मनोकामना 25
प्रा. दगाजी देवरे
7738601925
31/01/2019
"
Comments
Post a Comment