देव
पाण्याच्या थेंबाला पाण्यापेक्षा वेगळे समजणे म्हणजे आपल्यापेक्षा देवाला वेगळे मानणे.सोन्याच्या दागिन्याला सोन्याच्या खाणीपेक्षा वेगळे मानणे .मातीपासून बनवलेल्या मुर्तीला मातीपासून वेगळे मानणे. सूर्याच्या किरणाला सूर्यापासून वेगळे मानणे .चुंबकाच्या छोट्या तुकड्याला मोठ्या चुंबकापेक्षा वेगळे मानणे .नदीच्या पाण्याला समुद्राच्या पाण्यापेक्षा वेगळे मानणे. कापडाच्या धागाला कापडापेक्षा वेगळे मानणे. स्वत:च्या अवयवांना शरीरापेक्षा वेगळे मानणे . एक दिवसाला महिण्यापेक्षा वेगळे मानणे .एका महिण्याला वर्षापेक्षा वेगळे मानणे . स्वप्न पडलेल्या व्यक्तीला स्वत:पेक्षा वेगळे मानणे . एका दिवसाच्या पावसाला वर्षा रूतूपासुन वेगळे मानणे . थंडीला हिवाळ्यापासून वेगळे मानणे . गरमीला उन्हाळ्यापासून वेगळे मानणे . जंगलातील एका झाडाला जंगलापासून वेगळे मानणे .एका बोटाला पंजापासून वेगळे मानणे . एका कबूतराला थव्यापासून वेगळे मानणे . कळपातील एका हरणाला कळपापासून वेगळे मानणे . जसे आत्म्याला देवापेक्षा वेगळे मानणे . तात्पर्य आपण त्या परमेश्वराचे अंश आहोत त्याच्यापेक्षा आपण वेगळे नाहीत
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment