Skip to main content

श्रीमंतातले गरीब

श्रीमंतातले गरीब

का राहतात लोक गरीबांसारखे
फाटलेल्या जीन्स घालून
काहीच कसे वाटत नाही
जनतेची भीती सोडून

फाटलेल्या जीन्सची फॅशन
आली आहे म्हणतात
अंग प्रदर्शन दिसते
बघणारे शरमून जातात

गरीबांना नाही मिळत
अंगभर कपडे
श्रीमंताकडे असते रेलचल
पण ठेवतात रूप उघडे

आईवडिलांचाही होतो नाईलाज
बघण्याशिवाय नसतो पर्याय
मुले झालीत जास्तच हुशार
समजून सांगण्याचा शोधावा उपाय

श्रीमंत राहूनही राहतात
भिकारी बापुडे
फॅशनच्या नावाखाली मुले
घालतात  कोणतेही कपडे

थोरांमोठ्यांचे संस्कार मुले
तुडवतात पायदळी
फाटलेल्या लोकांचे ठेवतात आदर्श
म्हणून अशी बुध्दी त्यांना मिळाली

पैशांची नसते काहींना किंमत
म्हणून करतात असे नाटकं
भरपूर पैसे मोजून
घेतात कपडे फाटकं

स्वातंत्र्यांचा घेऊ नये
असा गैरफायदा
संस्कृती जाते लयाला
फाटके घालणार नाही असा करा वायदा
प्रा.  दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...