Skip to main content

विद्यादान

विद्यादान
असे म्हणतात की विद्येचे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे .त्या विद्येच्या जोरावर आपण कोणतेही पद प्रतिष्ठा प्राप्त करू शकतो .विद्येमुळे गरीब माणूस श्रीमंत  होतो एखाद्याकडे विद्या विशेष असली की मोठमोठे लोक त्याला घाबरतात .काही लोकांकडे विद्या असते पण त्यांना दुसर्‍याला द्यायची नसते कारण दुसर्‍यांचा झालेला फायदा त्यांना बघवत नसतो पण काहीजण दुसर्‍याला वाटण्यातच आनंद  त्यांना वाटतो आणि जितकी विद्या वाटली ती आपल्याकडे वाढत जाते कमी कधीही होत नाही .अशा विद्येचे दान करावे की माणूस समाजासाठी देशासाठी  उपयोगी पडू शकेल व त्याची व देशाची प्रगती होऊ शकेल .जी विद्या समाजाला व्यक्तीला देशाला हानी पोहचवते तिला विद्या न म्हणता तिला अविद्या म्हणतात .अविद्येच्या जोरावर अनेकजण दुसर्‍याला हानी पोहचवता तसेच समाजाला व देशाला काळिमा लागेल असे वर्तन करतात म्हणून बर्‍याच जणांकडे विद्या नसून अविद्या असते ज्याने  समाजाची प्रगती होते ती विद्या व समाजाचे देशाचे नुकसान जिच्यामुळे होते ती अविद्या .दैनंदिन जीवनात सुध्दा आपण लोकांना सल्ला देतो मग काहीजण असा सल्ला देतात की त्या सल्याने तो माणूस अडचणित सापडतो तेव्हा त्या सल्याला अविद्याच म्हणतात विद्या ही पवित्र सुसंस्कृत  सुंदर  विकास करणारी असते तर अविद्या अपवित्र असंस्कृत व समाजाचा नाश करणारी असते विद्येमुळे माणूस उच्च पद प्राप्त करू शकतो तर अविद्येने उच्च पदावरून खाली रसातळाला येऊ शकतो .विद्येला सरस्वती म्हणतात तर अविद्येला चेटकीन म्हणतात म्हणून आपण रोज विद्या वाटतो की अविद्या तसेच दुसर्‍याकडून विद्या घेतो की अविद्या याचा विचार करावा व विद्येचे दान हे सर्वश्रेष्ठ दानअसते कारण माणसातला रावण जाऊन  त्याच्यात देवत्व बहाल करण्याची ताकद तिच्यात असते तसेच झोपडपट्टीतला माणूस महालात आणण्याची ताकद तिच्यात असते तर अविद्येने महालातला माणूस जेलमध्ये  तर प्रतिष्ठित माणूस कलंकित करण्याची ताकद  अविद्येत असते म्हणून विचारपूर्वक  पाऊले उचलली तर आपण विद्यादानच करणार व घेतांना विद्याच घेणार .पटतं का बघा
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...