शांतीचा सागर राणे मॅडम
तुम्हांला देतो निवृतीच्या
मनापासून आज शुभेच्छा।
परमेश्वर देवो निरोगी आयुष्य
अशी करतो इच्छा ।। 1।।
बेचाळीस वर्ष केला
रूपारेलमध्ये तुम्ही प्रवास ।
भुर्रकन निघून गेलीत एवढे वर्ष
नाही कळले तुम्हांस ।।2।।
सगळ्यांना येईल तुमची
सतत आठवण ।
कारण सर्वांच्या मनात केली
तुम्ही चांगल्या गोष्टींची साठवण ।। 3।।
अनेक बघितले असतील
जीवनात तुम्ही चढउतार ।
त्यांना सामोरे जाऊन
केली तुम्ही नौका पार ।। 4।।
एका शब्दाने नाही दुखावले
तुम्ही आजपर्यंत कुणाला ।
पण काम करून घेण्याची
हातोटी आहे मात्र तुम्हांला ।। 5।।
काही जणांनी केला असेल
जास्त कामाबद्दल संताप ।
पण गोड शब्दाने समजावून
उतरवला त्यांचा ताप ।। 6।।
अनेकांचा आला असेल
तुम्हांलाही काही वेळा राग ।
शांत मनाने केला तुम्ही
रागाचाच त्याग ।। 7।।
तुम्हांला भेटण्याची सर्वांना
असेल कायम आस ।
प्रत्येक जण कायम म्हणेल
केव्हा भेटेल आपला माणूस खास ।। 8।।
तुमच्या सारखी माणसे आहेत
रूपारेल काॅलेजचे वैभव ।
भविष्यांत तुमची कुणाला येईल सर
वाटतं नाही मला संभव ।। 9।।
तुम्ही दिला आपल्या
पदाला योग्य तो मान ।
म्हणून वाटतं राहील
तुमचा कायम आम्हांला अभिमान ।। 10।।
तुम्हांला बघितल्यावर वाटत
नव्हती कधी भीती ।
तुमच्या सहकार्यामुळेच घेतली
सगळ्यांनी कामात गती ।। 11।।
अनेकांनी केल्या असतील
चुका आपल्या कामात ।
पण तुम्ही हळूच सांगितल्या
चुका त्यांच्या कानात ।। 12।।
अनेक समस्या सोडवतांना
नव्हती तुम्हांला कोणती चिंता ।
कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांचे
उत्तर होते मॅडम सुजाता ।। 13।।
तुम्ही आमचे सर्व प्रश्न
चुटकीनिशी सोडवली ।
पण आमच्या लिव्ह फाॅर्मवर
तुमची सही मात्र राहिली ।। 14।।
शिक्षकांमधील संबंध दृढ होण्यासाठी
कधीच केली नाही वजाबाकी अणि भागाकार
आजपर्यंत करत राहिले
बेरीज अन फक्त गुणाकार ।।15।।
संकटे विचार करत होते
तुमच्या पर्यंत कसे पोहचायचे ।
पण तुमच्या भोवती संरक्षणाचे
कवच होते मैत्रिणींचे ।। 16 ।।
काॅलेज सोडतांना होतील
तुमचे पाऊले जड ।
पण यशस्वीपणे कारकीर्द गेली
यालाच म्हणतात जिंकला गड ।। 17।।
उद्यापासून तुमच्या मैत्रिणी
खातील डबा नि :शब्दपणे ।
गहिवरून येतील त्यांचे डोळे
तुमच्या छान आठवणीने ।। 18।।
येत राहा मॅडम
आधी मधी काॅलेजमध्ये ।
अन् शांतरस वाटून
जात जा सगळ्यांमध्ये ।। 19 ।।
कामाच्या व्यापात झाले
असेल तब्बेतीकडे दुर्लक्ष ।
आता नाही पाच तासांचे टेंशन
म्हणून उद्यापासून वाटेल मिळाला मोक्ष ।।20 ।।
चुकलं माकलं असेल
तर सगळ्यांमा माफ करा ।
मोठे मन आहे तुमचे
आमची विनंती स्विकारा ।। 21 ।।
कृतज्ञता म्हणून काही
शब्द मी लिहिले ।
तुमचे शांत राहण्याचे विचार मात्र
कायमचे मनात कोरले ।। 22।।
प्रा. दगाजी देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment