एकच वाट
आपण जीवनात बर्याच वेळा एकाच वाटेने जात असतो व त्या वाटेवर एवढे प्रेम जडते की इतर वाटा चांगल्या जरी असल्या तरी त्यांच्याकडे ढूंकूनही पाहत नसतो त्यामुळे त्या वाटांमधील ज्ञान आपण मिळवू शकत नाही म्हणून ज्या ज्या वाटा आहेत त्या सगळ्यांचा विचार करावा व प्रत्येक वाटांमधील चांगले घेण्याचा प्रयत्न करावा काहीवेळा आपण निवडलेली वाट बरेच वर्ष गेल्यानंतर चुकीची वाटते पण वेळ निघून गेलेली असते व इतर वाटाही निघून गेलेल्या असतात त्यामुळे संकूचितपणा सोडून सारासार विचार करावा .एक म्हणतो तेच खरे व बाकीचे लोकांचे न ऐकता ते खोटेअसे न करता स्वत:प्रयोग करून बघावा तेव्हा वाटेल इतर वाटाही छान आहेत व त्यातूनही आपल्याला ज्ञान जीवनपयोगी मिळू शकते .दत्तात्रेय महाराजांनी 24 गुरू केले होते असे वाचण्यात आले माझ्या.स्वत:च्या शरीरालाही त्यांनी गुरू मानले कारण शरीराकडून ज्ञान मिळते .आपण जवान आहोत की म्हातारे यांचे लक्षणे शरीर दाखवायला सुरू करते म्हणून ज्या ज्या वाटेवर चांगले आहे ते घ्यावे एकाच्याच नादी लागून बाकीचे मुर्ख आहेत असे वाटून घेऊ नये म्हणजे त्यावेळी आपला विकास हा चांगला होईल सर्व प्रकारचे ज्ञान मिळेल व दुसर्याबद्दल द्वेष वाटणार नाही कारण आपण एकच वाट निवडली .दुसरी वाटही चांगली आहे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पण आपल्याला पहिल्या वाटेशिवाय काहीच माहीत नसते तेव्हा दुसर्या वाटेचा आपण द्वेष करतो किंवा कानाडोळा करतो पण सगळ्या वाटांमधील चांगले घेतले तर आपला फायदाच आहे.एकाच संप्रदयाच्या मागे न लागता बाकीच्या मध्ये काय चांगले आहे ते घ्यावे. .बघा मला असे वाटते .तुम्हांलाही तसे वाटत असेल तर बघा जमतं का ?
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment