सत्ता
सत्तेसाठी सारे करता आहेत
जीवाचा आटापिटा
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून
मार्ग शोधता आहेत सत्ता मिळवण्याचा
सत्ता हेच जीवनाचे अंतिम सत्य
हे मानता आहेत सगळे
म्हणून पक्ष बदलता आहेत
वेगवेगळे
तिकिट मिळाले तरच
पक्षांबद्दल प्रेम समजतात
नाही मिळाले तर अनेक वर्षाची
पक्षांची निष्ठा मात्र तोडतात
समाजसेवा करण्यासाठी हवी
कशाला सत्ता
सत्ता भोगूनही काहींनी
वाढवली नाही आपली मालमत्ता
सत्तेसाठी पडतो सत्याचा
कायमचा विसर
जीवनाच्या सत्यांपासून जातात
कायमचे मात्र दूर
मानले तर सत्ता नसूनही
करता येते लोकांची सेवा
नाही मानले तर सत्ता राहून
खाता येते जनतेच्या पैशांचा मेवा
कुणी काय नाही केले
याचा हिशोब नको जनतेला
तुम्ही काय काय खरंच करणार
हे सांगा रयतेला
आरोप प्रत्यारोप करून
शेवटी एकत्र हसत तुम्ही जेवणार
जनता मात्र तुमच्यावर विश्वास ठेवते
प्रत्येक वेळी विश्वासघात होत राहणार
जनतेला आपल्या गरजा
मिटवणारे सरकार हवे
फक्त आश्वासने नकोत
ते पूर्णत्वाला जायला हवे
सामान्य माणूस
Comments
Post a Comment