बालदिन
प्रत्येक माणसात दडलेला
असतो एक बालक
वेळप्रसंगी येतो तो बाहेर
पण झालेला असतो पालक
आतील बालक जागृत असणे
असते आनंदाचे लक्षण
जगावे बालकासारखे नेहमी
सुखदु:खाचे प्रसंग विसरून
रागद्बेष नाही ठेवत बालक
आपल्या कायम मनात
म्हणून नेहमी असावे
बालक आपल्या आत
बालकासारखे असावे कायम
जीवनात आनंदी
म्हणून साद घालून जागे
राहण्याची द्यावी त्याला वर्दी
आतील बालकाला मनापासून
देतो आज शुभेच्छा
बालकासारखे निर्मळ मन
होईल अशी करतो इच्छा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment