नवरी आली घरा
आली नवरी लक्ष्मीच्या पाऊलांनी
घर भरेल आता सुखसमृध्दींनी
सारी चिंता आता मिटेल
दु:ख आपले गाठोडे घेऊन पळेल
तिच्या आगमनाने शांती येईल घराला
आता काळजी नको कोणती करायला
रोहनचा आता झाला रोहनराव
बदलावा लागेल आता पेहराव
दोघांचे हसून हसून गाल असतील दुखत
असेच कायम हसत राहा खर्या आयुष्यांत
सरांना मिळाली पदवी सासरेबुवांची
अभिमानाने सांगत राहतील माझी सून गुणाची
ताई बनल्या आता सासूबाई
पण दिसतील इतरांना सुनेच्या त्या आई
प्राजक्ता झाली एकुलती एक ननंद
ती देईल वहिनीला मैत्रीसारखा आनंद
आता घर कसे भरलेले वाटते
जसे समुद्राला आले आनंदाचे भरते
लग्नाला होती हजेरी सरांच्या प्रेमळ माणसांची
हीच तर मिळाली पावती सरांच्या कामांची
असेच सर्वजण राहा कायम आनंदात
हीच प्रार्थना करतो आज सत्यनारायनाच्या देऊळात
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment