शिमला
शिमला शहर आहे भारतात
हे होतो फक्त ऐकून
आज प्रत्यक्ष बघायला मिळाले
येथील थंडी अनुभवून
संपूर्ण डोंगरात वसवले
सुंदर शहर शिमला
देवाचा आविष्कार मी
प्रत्यक्ष बघून अनुभवला
संपूर्ण भारतात उष्णतेने
मांडला प्रचंड कहर
पण देवाने चालू केला एसी
शिमला शहराच्या डोक्यावर
येथील स्वच्छता बघून
थक्क व्हायला होते
शिस्तही फार आहे चांगली
एवढी गर्दी राहूनही कसे शक्य होते
हाॅटेलस व इमारती कशा बांधल्या असतील
हा प्रश्न पडला आहे मला
स्वर्गातील इंजिनिअर आराखडा
बहूतेक देऊन गेले असतील
येथील चर्च व समोरील सपाटी
पाहून थक्क व्हायला होते
कसे बांधले असतील रस्ते
या विचाराने डोकं माझं गरगरते
एवढी वाहने राहूनही
शहरात दिसली नाही ट्राॅफिक
पोलीसांची शिस्त आहे चांगली
हे बघून झालो मी आवाक
एकाही माणसाचे बघितले नाही
मी पोट सुटलेले
सतत चालून चालून मेहनतीने
शरीराला काटक त्यांनी ठेवले
येथील इमारतीवर नियोजन करून
दिसली पार्कीग सगळीकडे
कमी जागेचा कसा उपयोग करावा
हे बघायला यावे इकडे
येथील उंचच उंच झाडे
आहेत निसर्गाचा अदभूत नजराणा
स्वर्गातून यांची लागवड करण्यासाठी
आला असेल प्रत्यक्ष विश्वाचा राणा
येथील लोकांचे उपजीवीकेचे
पर्यटक आहेत साधन
पर्यटकही येतात भरपूर
खर्च करून जातात भरपूर आपले धन
निसर्गाने पांघरली जणू
थंडीची मोठी चादर
ती अनुभवण्यासाठी यावे
प्रत्यक्ष येऊन व्हावे येथे सादर
शिमला करार झाला होता
याच थंडीच्पा शहरात
इंदिराजीनी केली होती निवड
कारण ते पडले होते शिमल्याच्या प्रेमात
शिमला शहर आहे भारतात
याचा मला वाटतो अभिमान
उन्हाळ्यात यावे येथे कायम
मन आत्मा शांत जावे करून
देशमुख सरांचे मानून आभार
दिला आनंद त्यांनी जीवनी
त्यांच्यामुळेच घेता आली
ऐन उन्हाळ्यात थंडीची मेजवानी
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment