फुशारकी
काहीजण फुशारकी मारण्यात फार तरबेज असतात आपण कशाची फुशारकी मारतो तेच त्यांना समजत नाही व अशा फुशारकी मारण्यामुळे आपली प्रतिमा कशी निर्माण होईल याचा कोणताही विचार नसतो फुशारकी मारणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने पराक्रमच म्हणावा लागेल काही उदाहरणे घेऊन बघू काही म्हणतात की माझा शब्दाला बायकोने विरोध केला म्हणून मी तिच्याशी भांडण केले व मारामारी केली .मी सकाळी सकाळी दारू पितो व मला सर्व घाबरतात काही बोलतात मी रात्री कितीही उशिरा घरी गेलो तरी कुणाची हिंमत नाही की का उशिरा आला विचारायची काही म्हणतात मी घरी गेल्यावर सर्व घाबरून असतात .काही बोलतात मला भाजी आवडलीानाही तर मी ताट फेकून देतो काही म्हणतात सासरवाडीच्या लोकांची माझ्यापुढे बोलायची हिंमत नाही व बोलले तर असा काही अपमान करतो की पुन्हा तसे बोलायची हिंमत करणार नाही बायको मला विचारल्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही तसेच बायकांचे म्हणणे असेकी सासूला मी सरळ केले मी सून असुनही सर्व माझ्या पुढे पुढे करतात सर्व मला घाबरुन असतात .नवरा माझ्या शब्दाबाहेर नाही अशा पध्दतीने फुशारकी मारणारे बरेच जण असतात व ही फुशारकी त्यांना पराक्रम वाटतो पण तो पराक्रम नसुन ती त्यांची निगेटिव्ह मानसिकता असते मनाची विकृत वासना असते आता खरी फुशारकी मारणारे फार कमी असतात
मी आज एका गरजवंताला पैशांची मदत केली मी अंध माणसाला रस्ता ओलांडुन दिला मी माझा वाढदिवस अनाथ बालकांबरोबर साजरा केला मी माझ्या घासातला घास भुकेल्या माणसाला दिला पावसात भिजत असलेल्या गरीब विद्यार्थ्याला छत्री घेऊन दिली संकटात सापडलेल्या माणसाला शब्दाने आधार दिला मी एका गरजवंताला नोकरी व्यवसायासाठी मदत केली मी आईवडिलांना परदेशी टूर घडवून आणली आज ट्रेनमध्ये वयस्कर माणसाला माझी जागा बसायला दिली मी आजारी व्यक्तीला अचूक दवाखाण्याची माहिती दिली अशा फुशारक्यांना खरे तर पराक्रमच म्हणावा लागेल व अशा फुशारक्या माराव्यात जेणेकरून इतर लोकही प्रेरणा घेतील व तसे करण्याचा प्रयत्न करतील .विचार करा तुम्ही कोणत्या प्रकारच्या फुशारकी मारता व ती फुशारकी पराक्रममध्ये गणली जाईल असे करायला जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment