भगवान श्रीकृष्णाचा whatsapp
आजच श्रीकृष्णाचा whatsapp आला बोलला आज आहे माझा वाढदिवस लोक उत्साहाने साजरा करतात त्यामुळे मला फार आनंद होतो पण दहीहंडीला जेव्हा व्यापाराचं राजकारणाचं स्वरूप दिले जाते त्यावेळी खूप दु:ख होते लाखो रूपयांचे बक्षिस लावतात त्यासाठी देणग्या गोळा करतात तरूण मुलेही दारू पिऊन नंगानाच करतात तेव्हा मला अति दु:ख होते तो कानठळ्या बसणारा आवाज लहान मुलांना व म्हातार्या माणसांना किती त्रासदायक असतो पण त्याचा कुणीच विचार करत नाही पाण्याची नासाडी करतात .माझ्या प्रेमापोटी करतात हे सांगत असतात पण माझे नाव घेऊन असला धांगडधिंगाना मला अजिबात आवडत नाहीमाझा कर्मयोग सिध्दांत लोक विसरतात ज्याने जे कर्मकेले त्याचे मी फळ देतो पण माझा वापर करून लोकांना लुबाडले जाते ते मला बिलकूल पसंत नाही मी सांगितलेली गीता लोक वाचत नाही व जे वाचतात ते आचरणात आणत नाही जे दुध दही लोणी वापरतात विकतात त्यात भेसळ केली जाते व त्या पदार्थांना माझे नाव ठेवून लोकांना फसवले जाते .मी लोकांना अजून समजलो नाही फक्त माझ्या नावाचा वापर करून आपला स्वार्थ साधतात .मोठ्या मोठ्या दहीहंडी बांधून लोकांना जमा करायचे व आपण किती ग्रेट आहोत हे दाखवून मतांचा जोगवा मागायचा व खरे काम करायचे विसरून जायचे असा फोलपणा बघून मला वाटते उगीच मी दहीहंडी फोडत होतो लहाणपणी .नसते केले असते तर बरे झाले असते माझे विचार जर लोकांमध्ये रूजले तर आत्महत्या थांबतील .आळस लोक करणार नाहीत कुणाला फसवणार नाहीत .माझे कर्मयोग व भक्तियोग हे ज्यांना कळले ते नक्कीच या संसारातुन तरुन जातील व अशा लोकांना मी माझ्या मस्तकावरचा मुकूट करतो व त्यांना अभिमानाने मस्तकावर धारण करतो त्यांची काळजी वाहतो त्यांचा भार मी वाहतो
आपलाच
श्रीकृष्ण भगवान
Comments
Post a Comment