मोबाईल नंबर व आपले विचार
मोबाईल नंबर कुणाचा माहीत असेल तर आपण नंबर टाकल्यावर लगेच त्या व्यक्तीपर्यंत आपला आवाज पोहचतो तसेच व्हिडिओ काॅलिंग ने प्रत्यक्ष दर्शन होते म्हणजे नंबर डायल करताच frequency match होते व आपण त्याच्याशी connect होतो त्याचप्रमाणे जसे आपले मनात विचार असतात त्याप्रमाणे वातावरणात ते जातात व त्या विचारांसारखे आपल्याशी connect होतात समजा आपल्या मनात आले की मला माझा जूना मित्र भेटला पाहिजे व ती इच्छा फार मनापासुन केलेली असते तेव्हा ते विचार वातावरणात मिसळतात व ते त्याच्यापर्यंत पोहचतात व काही दिवसांनी अचानक तो आपल्या समोर उभा राहतो त्यासाठी काही दिवस काही महिने काही वर्षही लागू शकतात काहीवेळा आपल्याला एखादी गोष्ट खाण्याची मनापासून इच्छा झाली तर मग ती आपल्याला एखाद्या पार्टीत किंवा लग्नात किंवा घरी मिळते .काहीवेळा आपल्याला एखाद्या तिर्थ ठिकाणी जायची इच्छा होते मग काही दिवसात किंवा महिण्यात तो योग जुळून येतो आपल्या आवाक्यात असणारी गोष्ट आपल्या विचाराने आपल्याकडे येते .एखादा चोर असेल तर त्याला वाटते एखादी चांगली चोरी करता आली पाहिजे व काही दिवसात त्याला तशी संधी मिळते मग पुढे पोलीसांकडून पकडला जाऊन त्याला शिक्षाही होऊ शकते पण त्याने जो विचार केला तशी frequency जुळून येते म्हणून आपले जसे विचार तसे ते वातावरणात मिसळतात व तशी frequency जुळली जाते व आपल्यासमोर ते प्रकट होते एखादा चुकीचा नंबर डायल केल्यावर त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहचु शकत नाही तसेच एखादा असा विचार असतो की त्या विचाराप्रमाणे घडत नाही काहीवेळा आपल्याला गाडी घ्यायची इच्छा झाली व ती घेण्यासाठी आपण समर्थ आहोत तेव्हा काही दिवसात ते आपण अंमलात आणतो किंवा अंमलात आणायला भाग पाडले जाते म्हणून निसर्ग किंवा नियती कुणाचेच चांगले किंवा वाईट करत नाही तर आपले जसे विचार तसेच आपल्याला मिळत असते म्हणून आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो त्यामुळे विचार चांगलेच ठेवले पाहिजे.काहींना आला असेल असा अनुभव .बघा विचार करा व पटतं का बघा .नसेल पटतं तर टाईमपास समजून सोडून द्या
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment